Sankhalim Municipality Market 
गोवा

Sankhalim Municipality Market: साखळीचा बाजार आता आठवड्यातून दोन दिवस; नागरीक, व्यापाऱ्यांना पालिकेचे आवाहन

गणेश चतुर्थीनंतरही दोन दिवसीय आठवडी बाजार सुरूच राहणार आहे

Pramod Yadav

Sankhalim Municipality Market: साखळीत दर सोमवारी भरणार आठवडा बाजार आता येत्या आठवड्यापासून दोन दिवस भरणार आहे. साखळी बाजारातील व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार साखळी नगरपालिकेने ठराव घेऊन आता आठवड्याचा बाजार दोन दिवस करण्याचे ठरविले आहे.

साखळीच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, दिपा जल्मी, निकिता नाईक, मार्केट निरिक्षकांनी सोमवारी (दि. 28) बाजारात फिरून जागृती केली.

सोमवारच्या बाजाराला आलेल्या सर्व फिरत्ता विक्रेत्यांना येत्या रविवारी व सोमवारीही बाजाराला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. या निर्णयामुळे बाजारातील व्यापारीही समाधानी व आनंदी झाले आहेत. साखळी बाजारात लोकांची वर्दळ वाढावी व त्याचा लाभ बाजारातील सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांना व्हावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी सांगितले.

गणेश चतुर्थीनंतरही दोन दिवसीय आठवडी बाजार सुरूच राहणार आहे. शिवाय बाजाराला सुसूत्रता आणली जाणार असल्याचे उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांनी सांगितले.

येत्या तीन सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या भागातील अनेक लोक कर्मचारीवर्ग असल्याने त्यांनी रविवारी बाजार सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दोन दिवस बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असे नगराध्यक्षा रश्मी देसाई म्हणाल्या.

दोन दिवस बाजार केल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना देखील फायदा होईल. अशी प्रतिक्रिया नागरिक आणि येथील व्यापारी वर्गाने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT