Sankalp Amonkar allegations against BJP Milind Naik Case Dainik Gomantak
गोवा

Milind Naik Case: भाजप माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहे: संकल्प आमोणकर

संकल्प आमोणकर यांचे भाजपवर आरोप

Vilas Mahadik

पणजी: भाजप आमदार मिलिंद नाईक यांच्या 'सेक्स स्कँडल'च्या मुद्द्यावरून गुन्हे शाखा आपल्याला पु्न्हा पुन्हा बोलावून त्रास देत असल्याचा आरोप मुरगाव येथील काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांनी मंगळवारी केला. आमोणकर यांना मंगळवारी गुन्हे शाखेत बोलावण्यात आले आणि नंतर त्यांना पणजीतील महिला पोलिस स्थानकात नेण्यात आले आणि नंतर महिला पोलिसांकडे दिलेले मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले. (Sankalp Amonkar allegations against BJP in Milind Naik case)

एका महिलेने आपल्या विरोधात नोंदवलेल्या तक्रारीवरून पोलीस आपला छळ करत असल्याचे त्यांनी सांगितले. “या महिलेने बिहारमध्ये तक्रार केली होती. ही तक्रार मुरगाव पोलीस स्थानकात आणि नंतर गुन्हे शाखेत हस्तांतर करण्यात आली होती. तिच्या तक्रारी वरून पोलिसांनी माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल केला, परंतु मी 35 दिवसांपूर्वी महिला पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवर अद्याप मिलिंद नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.” असे आमोणकर यांनी निदर्शनास आणून दिले. “मी भाजपच्या दबावाच्या डावपेचांना घाबरत नाही. त्यांनी मला अटकर सुद्धा केले तर मी त्यांना घाबरत नाही. मी यापुढेही सत्यासाठी लढणार आहे आणि मिलिंद नाईक यांच्या विरोधात सर्व पुरावे माझ्याकडे असल्याने सत्याचाच विजय होईल असा मला विश्वास आहे. आमच्याकडे असलेल्या सर्व कागदपत्रांसह आम्ही लवकरच न्यायालयात जाणार आहोत.” असे आमोणकार म्हणाले.

मिलिंद नाईक यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्यांनी दिलेले मोबाईल संच महिला पोलिस ठाण्यातून ताब्यात घेण्याच्या गुन्हे शाखेच्या कृतीबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

“आता मला माहित नाही की पोलिसांनी या मोबाईलमधील डेटामध्ये छेडछाड केली आहे की नाही. जरी त्यांनी तसे केले तरी आमच्याकडे डेटा आहे.” असे ते म्हणाले.

“भाजप सरकार मिलिंद नाईक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून माझ्याविरुद्ध कट रचत आहे. मिलिंद नाईक या सेक्स स्कँडलमध्ये सामील नसतील तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा का दिला?’’ असा प्रश्न आमोणकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT