Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: ‘संजीवनी’ कामगारांचे पुन्हा आंदोलन

वेतन थकले : प्रशासकांना अडविले; रोजंदारीवर काम न करण्याचा निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjivani Sugar Factory: संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या कंत्राटी व कायम कामगारांनी आपल्या मागण्यासाठी प्रशासकांना जाब विचारला.

कायम कामगारांचा गेल्या दोन महिन्याचा पगार अद्याप मिळाला नाही, तर कंत्राटी कामगारांना रोजंदारीवर कामावर ठेवल्यामुळे कामगारांनी प्रशासक सतेज कामत यांची भेट घेऊन मागण्या सादर केल्या.

परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कामगार संतप्त झाले. संध्याकाळी कंत्राटी कामगारांनी सतेज कामत यांनी अडविले. त्यानंतर पोलिस वाहनांतून कामत घरी निघून गेले.

कामगार नेते बाबू गवळी म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून आमच्या सर्व समस्या मांडल्या.

तेव्हा प्रशासकांना दूरध्वनीवरून त्यांनी आम्हांला कामाला घ्या, असे सांगितले. त्यानुसार १२ जुलैपासून आम्हांला संजीवनीच्या बागायतीमध्ये कामाला जा, म्हणून प्रशासक कामत यांनी सांगितले.

पण आम्हांला रोजंदारीवर काम नको, कायम स्वरूपी कामावर घ्यावे, अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत आम्हांला कामासंदर्भात कायमस्वरूपी ऑर्डर मिळत नाही, तोपर्यंत कामगार कामावर येणार नाहीत.

सायंकाळी ३ पर्यत प्रशासक सत्तेज कामत विरूध्द कामगार असा वाद सुरू होता. कामगारांनी साखर कारखान्याच्या गेट समोर धरणे आंदोलन केले, घोषणाबाजी केली.

यावेळी आरजी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कामगारांच्या समस्या ऐकल्या व तुमच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू असे आश्वासन दिले.

पोलिस वाहनांतून ‘ते’ निघाले!

प्रशासक सत्तेज कामत यांना आम्ही आम्हांला स्पष्ट सांगत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना गेटबाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. तेव्हा मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला.

पोलिस बंदोबस्तात प्रशासक जेव्हा त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी या आठवड्यात पगार होणार, असे सांगितले, तेव्हा आमचा पगार आम्हाला मिळेल, पण आम्हाला (डेलीवेजीस) घ्यायला तुम्हाला कोणी सांगितले?

कामगारांचा पवित्रा पाहून त्यांनी आपली कारगाडी स्टार्ट केली आणि जाण्यास निघाले. तेव्हा सर्व कामगारांनी रस्ता बंद करीत गेट समोर धरणे धरले.

पोलिसांनी त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न केला, पण कामगार काही ऐकेना, तेव्हा प्रशासकाची गाडी कारखान्यातच ठेवून पोलिस संरक्षणात प्रशासक सत्तेज कामत यांना पोलिसांच्या वाहनातून घरी गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT