Sanjeev Verekar Dainik Gomantak
गोवा

Sanjeev Verekar : ‘साहित्य अकादमी’ प्राप्‍त कवी संजीव वेरेकर निवर्तले

अन्यायाविरोधात लढणारे कवी, अशी वेरेकरांची ओळख

दैनिक गोमन्तक डिजिटल

Sanjeev Verekar : लढवय्ये कवी अशी प्रतिमा असलेले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी आणि पत्रकार संजीव वेरेकर (64) यांचे शुक्रवारी रात्री 8.30च्या सुमारास निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्‍यामुळे त्यांना चार दिवसांपूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्‍योत मालवली.

संजीव यांच्‍या पश्‍‍चात पत्नी सरिता, दोन कन्‍या असा परिवार आहे. शनिवारी सावईवेरे येथील स्मशानभूमीत त्‍यांच्‍यावर अंत्यविधी होतील. संजीव यांच्‍यावर महिन्याभरापूर्वी वास्को येथील एका खासगी इस्पितळात पोटाची शस्त्रक्रिया करण्‍यात आली होती. त्यातूनच त्यांची प्रकृती पुन्हा खालावली.

मूळ सावईवेरे-फोंडा येथील वेरेकर कोकणी राजभाषा आंदोलनातही सक्रिय होते. अन्यायाविरोधात लढणारे कवी, अशी त्‍यांची ओळख होती. त्यांच्या ‘रक्तचंदन’ या कविता संग्रहाला 2021चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. ‘अस्वस्थ सूर्य’ या कविता संग्रहाला विमला पै पुरस्कार मिळाला होता.

‘सांज सुलुस’ या कविता संग्रहाला डॉ. टी. एम. पै प्रतिष्ठान पुरस्कार, ''वास्तू पुरुषाचो अंत जातना'' या संग्रहाला आकाशवाणी पुरस्कार तर ''भावझुंबर'' आणि ''मुंबर'' या संग्रहांना कोकणी भाषा मंडळ साहित्य पुरस्कार लाभला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protes: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

SCROLL FOR NEXT