Sanjay Dutt Dainik Gomantak
गोवा

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

The Evren Goa Sanjay Dutt: संजय दत्त याने हरकरण चावला, अंगद सिंग, कुणाल पटेल तसेच सुवेद लोहिया या आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने गोव्यात 'द एव्हरेन' या अत्यंत आलिशान हॉटेलची सुरुवात केली.

Manish Jadhav

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्या व्यावसायिक प्रवासात आता एक नवे आणि सुवर्णपान जोडले गेले. संजय दत्त याने हरकरण चावला, अंगद सिंग, कुणाल पटेल तसेच सुवेद लोहिया या आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने गोव्यात 'द एव्हरेन' या अत्यंत आलिशान हॉटेलची सुरुवात केली. विशेष म्हणजे, या हॉटेलचे अधिकृत उद्घाटन होण्यापूर्वीच त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर 'स्मॉल लक्झरी हॉटेल्स ऑफ द वर्ल्ड' या जगप्रसिद्ध नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आले.

केवळ निमंत्रणाद्वारेच प्रवेश मिळणाऱ्या या प्रीमियम नेटवर्कमध्ये स्थान मिळवणे ही कोणत्याही पहिल्याच हॉस्पिटॅलिटी व्हेंचरसाठी अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानास्पद कामगिरी मानली जाते. यामुळे हे हॉटेल जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

गोव्यातील (Goa) पारंपरिक बीच शॅक संस्कृतीपेक्षा वेगळी ओळख जपताना, या हॉटेलच्या रचनेत युरोपियन बुटीक शैली आणि गोव्याच्या इंडो-पोर्तुगीज संस्कृतीचा सुरेख संगम साधण्यात आला आहे. हस्तकलायुक्त लाकडी छत, ग्वाल्हेर स्टोनचे नक्षीकाम, हिरवेगार अंगण यामुळे या वास्तुला एक वेगळी ओळख मिळते. इथे अतिशय शांत आणि निसर्गरम्य दृश्ये दिसणाऱ्या आलिशान बुटीक सुट्सची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय, येथे येणाऱ्या पाहुण्यांच्या विश्रांतीसाठी आणि तणावमुक्तीसाठी सुंदर पोहोण्याचा तलाव, वेलनेस सेंटर आणि स्पा ट्रीटमेंट रुम्सची उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हॉटेलमधील 'सुएनोस दे कॅफे' हे भारतातील पहिल्या महिला नॅशनल बारिस्टा चॅम्पियन गीतू मोहनानी यांच्या मार्गदर्शनाखाली चालवले जाणारे एक विशेष कॉफी डेस्टिनेशन आहे. या हॉटेलचे सर्वात खास आकर्षण म्हणजे 'नाईन्स बाय द एव्हरेन' (Nines by The Evren) हे रेस्टॉरंट होय. जगप्रसिद्ध हॉटेल्समध्ये काम केलेल्या शेफ प्राची मेहता यांच्या नेतृत्वाखालील या रेस्टॉरंटमध्ये स्थानिक गोवन चवींना आंतरराष्ट्रीय तडका देऊन तयार केलेले अनोखे खाद्यपदार्थ खवय्यांसाठी सादर केले जात आहेत. शांततापूर्ण सुट्टी आणि रात्रीच्या उत्साही वातावरणाचा एकत्र अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी संजय दत्तचे हे हॉटेल एक उत्तम पर्याय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT