special students made A bouquet  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant Birthday : विशेष मुलांनी मुख्यमंत्र्यांसाठी बनविला पुष्पगुच्छ

सिद्धार्थ कुंकळ्येकर : वाढदिनी देणार भेट; संजय स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद कलागुण

दैनिक गोमन्तक डिजिटल

CM Pramod Sawant Birthday : पर्वरी येथील संजय स्कूलमधील विशेष मुलांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या 50व्या वाढदिनानिमित्त 50 फुलांचा पुष्पगुच्छ तयार केला आहे. हा पुष्पगुच्छ सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी त्यांना दिला जाईल, अशी माहिती भाजप प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली.

कुंकळ्येकर यांनी मुले बनवित असलेल्या फुलांची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत.

दृष्टिकोनात सकारात्मक बदल

विशेष मुलांसाठी नुकताच राज्यात पर्पल फेस्ट पार पडला होता. मुख्यमंत्री सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकारामुळे तो फेस्ट विशेष चर्चेत राहिला.

यशस्वीरित्या झालेल्या या फेस्टमुळे आता केंद्र सरकारही त्यात आपला वाटा उचलीत आंतरराष्ट्रीय स्तरावर हा फेस्ट करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्यात विशेष मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे दिसून आले आहे.

विशेष बाब संजय स्कूलमधील विशेष मुले ही विविध स्तरावर आपला ठसा उमटवत आली आहेत, त्यामुळे राज्य सरकार या मुलांच्या सतत पाठीशी राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT