Sanguem Town Hall Demolition Halted 10 Percent Remains
सांगे: सांगे नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून जीर्ण असा टाऊन हॉल धोकादायक स्थितीत असल्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी पाडण्यास प्रारंभ केला होता. टप्प्याटप्प्याने भाग खाली पाडून जमीन समांतर करण्यात येत होते. पण आश्चर्य म्हणजे संपूर्ण टाऊन हॉल न पाडता दहा टक्के भाग तसाच ठेवण्यात आला आहे. या स्थळी काम करणारी यंत्रणा गायब झाली आहे. यंत्रे इतरत्र हलवली आहेत. सध्या या ठिकाणी पहारा देणारेही गायब झाल्याने जनतेच्या मनात शिल्लक दहा टक्के भाग का पाडण्यात आला नाही, याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
टाऊन हॉल धोकादायक म्हणून गाई गडबडीत पाडण्यात आला. पण गेले पंधरा दिवस अर्धवट भाग तसाच का ठेवण्यात आला याचे ठोस उत्तर कोणी देत नसून काहीजण म्हणतात शिल्लक भाग पाडण्यासाठी बेंगळुरूमधून खास यंत्र मागविण्यात आले आहे. ते आल्यानंतर शिल्लक भाग पाडणार असल्याचे नगरपालिका सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नेमक्या याच शिल्लक भागाच्या बाजूला कार पार्किंग (Parking) केल्या जात आहेत. शिवाय आठवड्याचा बुधवार बाजार भरवला जात आहे. शिवाय पाडण्यात आलेले मातीचे ढिगारे तसेंच सोडून कंत्राटदार गायब झाले असून टाऊन हॉल मोडल्या नंतर मिळालेले लोखंडी साहित्य मात्र भरून नेले. सांगे नगरपालिका प्रशासन या संधर्भात कोणतीही हालचाल करीत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे. अधिकारी काय पवित्रा घेणार याकडे लोकांचे लक्ष आहे.
संपूर्ण टाऊन हॉल जर धोकादायक होता, तर मग नव्वद टक्के तोडलेला शिल्लक भाग धोकादायक नाही काय, असा प्रश्न ‘आप’चे सांगे गटाध्यक्ष मिल्टन फेर्नांडिस यांनी केला आहे.या शिल्लक भागाच्या बाजूला मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी कार्यालये असून लोकांची सतत वर्दळ असते म्हणून सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप यांनी तातडीने सांगे पालिकेला याचा जाब विचारून शिल्लक धोकादायक भाग पाडण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी फेर्नांडिस यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.