Sanguem Town Hall: ‘टाऊन हॉल’वर शेवटचा हातोडा! बांदोडकर यांच्या काळात उभारलेल्या इमारतीनं जागवल्या स्मृती

Sanguem Town Hall Demolition: सांगे येथील जीर्ण झालेला ‘टाऊन हॉल’ पाडण्‍याचे काम सुरू झाले आहे. येत्‍या शनिवार-रविवारपर्यंत हे बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्‍त करण्‍यात येणार आहे.
Sanguem Town Hall: ‘टाऊन हॉल’वर शेवटचा हातोडा! सांगेतील जीर्ण इमारतीनं आठवणींना दिला उजाळा
Sanguem Town HallDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे येथील जीर्ण झालेला ‘टाऊन हॉल’ पाडण्‍याचे काम सुरू झाले आहे. येत्‍या शनिवार-रविवारपर्यंत हे बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्‍त करण्‍यात येणार आहे. दरम्‍यान, गेली कित्‍येक वर्षे विनावापर पडून असलेला हा टाऊन हॉल पाडल्‍यानंतर तेथे नवीन प्रशासकीय कार्यालय किंवा व्यापारी संकुल उभारण्यात यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.

गोव्‍याचे (Goa) पहिले मुख्‍यमंत्री स्‍व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे सरकार असताना सांगेतील या टाऊन हॉलची उभारणी करण्यात आली होती. सुरवातीला हा टाऊन हॉल म्हणजे सांगेचे भूषण होते. अनेक कार्यक्रम, समारंभ याच ठिकाणी साजरे केले जात असत. काही वर्षे तेथे प्रशिक्षणार्थ्यांना आयटीआय प्रशिक्षण देण्‍यात आले. त्यानंतर व्यायामशाळा, भाजीविक्री, मासळी, चिकन, मटण विक्रेत्यांची तात्पुरती सोय म्हणून तेथे बसविण्यात आले.

मात्र त्यानंतर ही वास्तू अडचणीची ठरू लागली. वापर होत नसल्याने पडझड होण्यास प्रारंभ झाला. बाहेरील भागाचे तुकडे पडण्यास सुरवात झाली. तेव्हापासून या टाऊन हॉलची डागडुजी करावी की तो पाडून त्या ठिकाणी अन्य प्रकारचे बांधकाम करावे, हा विषय फर्मागुढी येथील अभियांत्रिकी कॉलेजसमोर ठेवण्‍यात आला.

पाच वर्षांपूर्वी अहवाल मिळूनही पालिका उदासीन

फर्मागुढी-फोंडा येथील अभियंत्‍यांच्‍या टीमने या जीर्ण व जुन्या झालेल्‍या टाऊन हॉलची पाहणी केली व त्‍याची डागडुजी न करता तो पाडण्‍यात यावा, असा अहवाल सादर केला. मात्र अभियंत्‍यांचा अहवाल सादर होऊन पाच वर्षे उलटली तरी टाऊन हॉल पाडण्यास नगरपालिका मंडळाने काहीच हालचाल केली नाही. खूपच आढेवेढे घेतले. पण दुर्घटना होऊ नये म्हणून काही नगरसेवक सातत्याने भीती व चिंता व्यक्त करू लागल्यामुळे अखेर कायद्याचा आधार घेऊन या टाऊन हॉलवर हातोडा चालविण्यात आला.

आठवणींना मिळाला उजाळा

सध्‍या टाऊन हॉल पाडण्‍याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्‍यानंतर काही दिवसांतच तेथील जमिनीचे सपाटीकरण केले जाईल. त्यानंतर त्‍या जागेवर कोणता प्रकल्‍प उभारावा हे ठरविले जाईल. अजून त्‍याबाबत कोणताही निर्णय घेण्‍यात आलेला नाही. परंतु सुरवातीचा काही काळ तरी तेथे पार्किंगसाठी जागा मोकळी असेल हे निश्‍चित. दरम्‍यान, गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून उभी असलेली ही इमारत आता जमीनदोस्‍त होत असल्‍यामुळे सांगेतील (Sanguem) अनेक ज्‍येष्‍ठ नागरिकांनी आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना कित्‍येकांचे डोळे भरून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com