Sanguem Power Shortage : पावसाळा सुरू होताच सांगे भागात वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडणे नित्याचे झाले आहे.
त्यामुळे जांबावली,नेत्रावळी, मळकर्णेवासीयांनी संताप व्यक्त केला आहे.
पण एक-दोन दिवस कोणीही समजू शकतो, पण तीन दिवस वीज पुरवठा खंडित झाल्यास काय स्थिती उद्भवेल, हे अनुभवण्यासाठी वीज अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात एक दोन दिवस रात्र घालवावी,असे आवाहन भाटीचे माजी उपसरपंच चंद्रकांत शाबा गावकर यांनी केले आहे. नेत्रावळी, जांबावली, मळकर्णे, आणि खुद्द सांगे शहरही अपवाद नाही.
मळकर्णे येथील सदानंद रायकर यांनीही तीच तक्रार केली असून वीज बिल भरण्यास विलंब झाल्यास तात्काळ वीज तोडली जाते.
मग आठवड्यातून किती दिवस वीज पुरवता, याचे उत्तर वीज खात्याने द्यावे, अशी मागणी केली आहे. तक्रार ऐकून घेण्यासही यंत्रणा कुचकामी ठरल्याची टीका त्यांनी केली.
तर सांगे शिवसेना प्रमुख यशवंत नाईक म्हणाले की काही ठिकाणी अधिकारी वयाने लहान असतात पण शिक्षणाने मोठे असतात.
याचे भान न ठेवता काहीजण उडवाउडवीची उत्तरे देत असतात. त्यात वाहन एकच असल्याने वीज पुरवठा वेळेत पूर्ववत होत नसल्याने त्रास होतो,असे नाईक यांनी स्पष्ट केले.
भूमिगत केबल; पण जोडणीच नाही
ग्रामीण भागात वीज खात्याने बंच केबलिंग द्वारे वीज पुरवठ्याचे स्वप्न दाखविले होते, पण ते स्वप्न सत्यात उतरत नाही. परिणामी जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्यातच जमा. वादळी वाऱ्यात झाड मोडून केबल वर पडताच कित्येक खांब जमीनदोस्त होतात.
काही ठिकाणी भूमिगत केबल घातली आहे, पण जोडणी नसल्याने या प्रकारातही जनतेचे पैसे पाण्यात बुडणार, असे चित्र आहे.आधीच व्यवस्था बरी म्हणण्याच प्रसंग लोकांवर आल्याचे गावकर यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.