Varca Beach Illegal Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Sanguem: सांगे येथील खाणीला अखेर पर्यावरण दाखला मंजूर! जलस्रोत, ग्रामस्थांचे आरोग्य, श्रद्धास्थानांचे रक्षण करण्याचे मोठे आव्हान

Goa Mining: सांतान (सांगे) येथे असलेल्या काले खनिज खाणपट्टा IV या लोखंड खनिज उत्खनन प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने सशर्त पर्यावरण मंजुरी दिली आहे.

Sameer Panditrao

पणजी: सांतान (सांगे) येथे असलेल्या काले खनिज खाणपट्टा IV या लोखंड खनिज उत्खनन प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने सशर्त पर्यावरण मंजुरी दिली आहे. फोमेंतो रिसोर्सेस प्रा.लि. या कंपनीकडून हा प्रकल्प राबवला जाणार असून मंजुरीसोबत कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. फेब्रुवारीत पर्यावरण दाखला जारी करण्यापूर्वीची जनसुनावणी घेण्यात आली होती.

या निर्णयामुळे गोव्यातील लोखंड खनिज उत्खननाला गती मिळणार असली तरी कडक अटींमुळे कंपनीला पर्यावरणीय संतुलन, जलस्रोत, स्थानिक ग्रामस्थांचे आरोग्य व श्रद्धास्थानांचे रक्षण करण्याचे मोठे आव्हान असेल.

सामाजिक बांधिलकी

 सांतान गावाला मोफत पिण्याचे पाणी पाइपलाइनद्वारे पुरवठा

 स्थानिक युवकांसाठी प्रशिक्षण व इंटर्नशिप योजना

 खाणी व वाहतूक मार्गावर घनदाट वृक्षारोपण, किमान ३३ टक्के ग्रीनबेल्ट

 कामगार व गावकऱ्यांसाठी नियमित आरोग्य तपासणी व वैद्यकीय शिबिरे

पर्यावरणीय उपाययोजना व अटी

 एकूण पाणी गरज दरदिवशी ३०० किलो लिटर्स, त्यापैकी २५५ किलो लिटर्स गोडे पाणी व ४५ किलो लिटर्स पुनर्वापरित पाणी

 पावसाळ्यातील पाणी खड्ड्यात ८.५० दशलक्ष घनमीटर क्षमतेने साठवले जाणार

 वनक्षेत्र : २१.१३३ हेक्टरसाठी - टप्पा १ - वन खात्याची परवानगी, टप्पा २ - मंजुरी मिळाल्यानंतरच खाणकाम सुरू

 वन्यजीव संवर्धन योजनेचा खर्च : ७८.०५ लाख रुपये (पूर्वी १२.५ लाख)

 पर्यावरण व्यवस्थापन योजना : भांडवली खर्च १६८.८३ लाख रुपये, वार्षिक खर्च रु. ९८.३१ लाख

 सार्वजनिक सुनावणीदरम्यान मांडलेल्या मागण्यांसाठी ३३.६० लाख रुपये तीन वर्षांसाठी राखीव

वाहतूक योजना

खनिज वाहतूक सावर्डे किंवा काप्शे जेटीपर्यंत (१२-१४ किमी) केली जाणार असून दोन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. वाहतुकीदरम्यान झिरो स्पिलेज, टारपोलिन झाकलेली वाहने, नियमित पाण्याची फवारणी व रस्त्यांचे स्वच्छतेचे काटेकोर पालन आवश्यक असेल.

प्रकल्पाची माहिती

खनिज उत्खनन क्षमता :

०.७५ दशलक्ष टन प्रतिवर्ष

अवशिष्ट कचरा :

३.० दशलक्ष टन प्रतिवर्ष

पट्टा क्षेत्रफळ : १५२.५०७३ हेक्टर

परवानगीची तारीख :

२२ ऑगस्ट २०२५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT