Arrested Sangolda police Dainik Gomantak
गोवा

Sangolda News: मुलीच्या उपचाराच्या बहाण्याने वडिलांना 22 लाखांना लुटले

अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

गोव्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे की काय ? अशी शंका निर्माण व्हावी अशा पद्धतीने राज्यात फसवणुकीच्या घटना घडत आहेत. आज सांगोल्डा येथील आजारी मुलीच्या उपचाराच्या बहाण्याने तिच्या वडीलांना अज्ञाताने तब्बल 22 लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

(Sangolda resident Rs 22 lakhs on pretext of helping with financial aid for treatment of ailing daughte)

मिळालेल्या माहितीनुसार सांगोल्डा येथील रहिवासी असणारी एक मुलगी किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. या मुलीच्या वडिलांना मुलीचे उपचार सरकारी योजनेतून करून देतो, असे आश्वासन देत अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडून सुमारे 22 लाख रुपये उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

गोवा पोलिसांनी याबद्दल अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची ही माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र एखाद्या आजारी व्यक्तीला ही फसवल्याच्या प्रकाराने सांगोल्डा परिसरात नागरिकांत एकच चर्चा सुरु आहे.

याबाबत काही स्थानिकांनी म्हटले आहे की, यापुर्वी गोव्यात फसवणूक मर्यादीत होती. आता मात्र हे प्रमाण वाढले असून प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्यात. तसेच गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: थोड्याशा पैशांकरता केलेल्या भ्रष्टाचारामुळे माणसे जळून, गुदमरून मेली; ही आग खूप दूरवर लागेल...

Video: FA9LA ची 'ट्रेंडिंग' स्टेप अक्षयने बसवली! डान्स कोरियोग्राफरचा खुलासा; म्हणाला, लडाखची उंची, हातात ऑक्सिजन सिलिंडर घेऊन तो...

हडफडे दुर्घटना; समिती नेमली, पाहणीही झाली! पण कारवाई होणार का? 'लईराई जत्रोत्सवा'च्या दुर्घटनेचा अहवाल आजही धूळ खात - संपादकीय

Goa Nightclub Fire: 'हा अपघात नव्हे, 25 जणांचा खून! हडफडे नाईटक्लब दुर्घटनेवरून आमदार लोबो संतापले; Watch Video

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा 'चॅप्टर' कोणी 'क्लोज' केला?

SCROLL FOR NEXT