Casino Dainik Gomantak
गोवा

Sangolda Casino: कॅसिनो कर्मचाऱ्यांचा दारूच्या नशेत धिंगाणा! सोशल मीडियावर होताहेत आरोप; सांगोल्डा येथील Viral Video मुळे चर्चा

Sangolda Casino Staff: रात्रीच्या प्रकारामुळे याचा त्रास स्थानिकांना त्रास होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात कॅप्शन देत वरील व्हिडिओबाबत अनेक दावे करण्यात आलेत.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: आल्तो बेला, सांगोल्डा येथील एका रेस्टॉरंटजवळ असलेल्या इमारतीत कॅसिनोच्या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आहे. यास्थळी कर्मचाऱ्यांपैकी काही दारूच्या नशेत धिंगाणा घालतात, असा आरोप होत आहे. रात्रीच्या प्रकारामुळे याचा त्रास स्थानिकांना त्रास होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात कॅप्शन देत वरील व्हिडिओबाबत अनेक दावे करण्यात आलेत.

याविषयी साळगाव पोलिसांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ २५ नोव्हेंबरचा आहे. सांगोल्डा येथील एका रेस्टॉरंटजवळ असलेल्या इमारतीत एका कॅसिनोच्या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आहे. तिथे सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.

घटनेच्या दिवशी एकजण दारूच्या नशेत आला असता, सुरक्षा रक्षकांनी त्याला अडविले. त्यानंतर इतरांच्या मदतीने त्याला रूममध्ये सोडले. पोलिस तिथे पाहणीसाठी गेले होते, मात्र कोणालाही धक्काबुक्की केली नाही. याशिवाय तिथे सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत, बाऊन्सर नाहीत. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला की, इमारतीत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांत आणि तिथे तैनात या बाऊन्सर्समध्ये बाचाबाची झाली.

प्रकरण वाढल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी पोलिसांना देखील धक्काबुक्की झाली. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढून या भागात पूर्ववत शांतता प्रस्थापित करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT