Sangli District Bank Dainik Gomantak
गोवा

कर्ज वसुलीची सूचना, सुट्टया रद्द; सांगली जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांची गोव्यात पिकनिक, एका पोस्टमुळे झाला भांडाफोड

सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुली सुरु आहे.

Pramod Yadav

Sangli District Bank: सांगली जिल्हा बँकेसंबधित एक मोठी बातमी समोर आली आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या. तरी देखील बँकेच्या सहा अधिकाऱ्यांनी कामावर असताना गोव्यात येत पिकनिक साजरी केली, त्यामुळे त्यांची थेट एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात बदली करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी गोव्यातील पिकनिकचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आणि त्यांच्या गुप्त पिकनिकची भांडाफोड झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांकडून थकबाकी वसुली सुरु आहे. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाला ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजना लागू करण्यात आली आहे. बँकेचे सीईओ शिवाजीराव वाघ यांनी एकरकमी परतफेड योजना राबवत जून अखेरपर्यंत वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासाठी सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्या देखील रद्द करण्यात आल्या.

दरम्यान, शनिवार, रविवार अशी सलग सुट्टी आणि सोमवारी रजा टाकून बँकेचे आठ अधिकारी गोव्यात मौजमजा करण्यासाठी आले. सर्वांनी तीन दिवस गोव्यात मौजमजा केली. पण, गोव्यातील सुट्टीचे फोटो सोशल मिडियावर टाकल्यामुळे अधिकाऱ्यांची सिक्रेट पिकनिक उजेडात आली.

अधिकाऱ्यांनी केलेला हा प्रकार समोर आल्यानंतर बँकेच्या सीईओ शिवाजीराव वाघ यांनी सक्त कारवाई करत या सर्व अधिकाऱ्यांची जत शाखेतून शिराळा शाखेत बदली केली.

मार्केट यार्ड शाखेचे आर.टी. नाटेकर, बी.आर. दुधाळ, उमराणी शाखेतील एस.ए. कांबळे, उमदी शाखेतील एस.एम. सोलनकर, एम.एम. मुल्ला, एम.एम. पाटील, एस.एम. तेली आणि दरीबडची शाखेतील ए.यू. वाघमारे अशी कारवाई झालेल्या आठ अधिकाऱ्यांची नावे आहेत.

दरम्यान, सध्या या घटनेची सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा होत असून, अधिकारी देखील सीईओ यांच्या कारवाईमुळे धास्तावले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT