Cash For Job Scam Arres Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: दीपश्री विरोधात तक्रार नोंदवणारा संदीपच निघाला फसवा; नोकरीचे आमिष दाखवत लुबाडले ५ लाख

Cash For Job Scam Arrest: काही दिवसांपूर्वी दीपश्री विरुद्ध म्हार्दोळ पोलिसांजवळ तक्रार नोंदवलेला संदीप परब हा स्वतः जॉब स्कॅममध्ये सामील असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली

Akshata Chhatre

फोंडा: सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून सामान्य लोकांना लुबाडण्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत. यात दिवसेंदिवस नवीन नावं जोडली जातायत. सोमवारी (दि. ११ नोव्हेंबर) रोजी समोर आलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी दीपश्री विरुद्ध पोलिसांजवळ तक्रार नोंदवलेला संदीप परब हा स्वतः जॉब स्कॅममध्ये सामील असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

खांडोळा पोलिसांनी एका माणसाच्या तक्रारीवरून संदीप जगन्नाथ परब याला अटक केली आहे. संदीपने तक्रार नोंदवणाऱ्या माणसाला नोकरी देण्याचे आमिष दाखवत तब्बल ५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचं त्याने तक्रारीत नोंदवलं आहे.

विशाल गावकर (वय, ३३ खांडोळा) असे तक्रारदाराचे नाव असून त्याला संदीप परब याने एलडीसी पदाच्या नोकरभरती बाबत माहिती दिली होती व यासाठी एकूण १४ लाख रुपये द्यावे लागतील असेही सांगितले होते.

ठरल्याप्रमणे विशाल गावकरने संदीपला ५ लाख रुपये दिले, मात्र काही काळ उलटल्यानंतर नोकरी किंवा पैसे परत न मिळाल्याने विशालने संदीप विरोधात तक्रार नोंदवली. विशाल गावकरची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी सध्या संदीपला ताब्यात घेतले आहे. संदीपने ही सर्व रक्कम दीपश्रीच्या ताब्यात दिल्याची माहिती देखील मिळते, कारण संदीप हा दीपश्रीचा मध्यस्थ म्हणून काम करत होता.

म्हार्दोळ पोलिसांकडे नोंदवल्या गेलेल्या तक्रारीनुसार दीपश्रीने ४४ जणांना विविध सरकारी खात्यांत नोकरी देण्याचं आश्वासन देत सर्वाधिक २० लाख, तर कमीतकमी ३ लाख रुपये घेतले आहेत. मात्र दीपश्री विरोधात तक्रार नोंदवणारा देखील संदीप असल्याने अजून एक प्रश्नचिन्ह कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2025: राजस्थानची 'रॉयल' रणनीती! मिनी लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, 'या' अनुभवी खेळाडूला केलं प्रशिक्षक

Cooch Behar Trophy: ..गोव्याने पकड गमावली! 5 बाद 27 वरुन छत्तीसगडच्या 170 धावा; फलंदाजांची खराब सुरवात

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Unwritten Horizon: ..आपला गोवा काय होता आणि काय बाकी राहिला आहे, हे सांगणारे प्रदर्शन ‘अनरिटन होरायझन’

IFFI 2025: आयसीएफटी युनेस्को गांधीपदक स्पर्धेतील चित्रपट कोणते? पहा लिस्ट..

SCROLL FOR NEXT