Goa CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant : गोव्यात वाळू उपसा कायदेशीर करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

कुडचडे गोळीबार, ड्रग्‍सप्रकरणी गंभीर पावले; मुख्य सचिव, दोन्ही जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांसोबत तातडीची बैठक

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant : भाजप नेत्या सोनाली फोगट यांचा खून, त्या पाठोपाठ कुडचडे येथे रेती कामगारांवर झालेला गोळीबार आणि हत्या या प्रकरणांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी आपल्या शासकीय निवासस्थानावर राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून झाडाझडती केली.

बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाळू उपसा कायदेशीर करणार असल्याचे सांगितले. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच कामगाराचा मृत्यू झाला असून दोषींवर कडक कारवाई करणार, असे ते म्हणाले.

बैठकीला मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, दोन्हीही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, खाण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत रेती आणि चिरे व्यवसायाचे कायदेशीर सुलभीकरण, अमली पदार्थ विरोधी पथक बळकट करणे या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यात सुरू असलेल्या अवैध रेती आणि चिरे खाणीसंदर्भात लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि हा व्यवसाय तातडीने कायदेशीररित्या सुरू करण्यासाठी पावले उचलली जातील. कुडचडे येथे झालेली दुर्घटना गंभीर असून रेती कामगाराचा झालेला मृत्यू हे पोलिसांच्या निष्काळजीपणाचे लक्षण आहे. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.’

कुडचडे येथील मांड बायसन येथील गोळीबार प्रकरणात पोलिसांना अद्यापही कोणतेच धागेदोरे मिळाले नाहीत. मात्र, हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

रेती व्यवसायावर न्यायालयीन बंधने

रेती आणि चिरे उत्खनन व्यवसायावर न्यायालयीन प्रक्रियेमुळे विविध बंधने आहेत. हा व्यवसाय कायदेशीररित्या सुरू करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. रेती व चिरे उत्खनन कायदेशीर,  सुलभरीत्या पण मर्यादित स्वरूपात करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्यात असे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी या बैठकीनंतर सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT