Goa Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Sand Mining: कामुर्लीत रेती उपसा सुरूच

रात्रीस खेळ चाले: जबाबदार व्यक्तींविरुद्ध कारवाईची मागणी

दैनिक गोमन्तक

Goa Sand Mining: कामुर्ली पंचायत क्षेत्रातील भरवणवाडा व अन्य भागात अवैधरित्या रात्रीच्या वेळी रेती उपसा सुरूच असून या बेकायदेशीर प्रकारात ज्या व्यक्तींचा सहभाग आहे त्यांच्याविरुद्ध संबंधित खात्याने कारवाई न केल्यास या वाड्यावरील नागरिक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा दिला आहे.

गेले अनेक दिवस सुमारे २० यांत्रिक व अन्य होड्या या रेती उपसा प्रकरणात गुंतल्या आहेत. रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत हा व्यवसाय चालत आहे. या बेकायदा रेती उपसा प्रकरणात जे गुंतले आहेत, त्यांना रोखण्याचे काम संबंधित खात्याने केले पाहिजे. या रेती उपशामुळे नदीच्या काठावर असलेल्या घरांना धोका निर्माण झाला असून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. या प्रकरणी स्थानिक आमदार तसेच अधिकाऱ्यांनी आवश्यक पावले उचलून स्थानिक ग्रामस्थाना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

कायदा हाती घेण्याची तयारी

या बेकायदेशीर रेती उपशाचा धोका भरवणवाडा, हाउसिंग बोर्ड, सातेरीवाडा, तीन माड भागातील रहिवाशांना होणार असून बंदर कप्तान खात्याने तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित रेती उपसा करणाऱ्यांना अटकाव न केल्यास स्थानिक नागरिक कायदा हाती घेण्याच्या तयारीत आहेत. तसे झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असे स्थानिकांनी सांगितले.

कामुर्लीत जनक्षोभ कायम

कामुर्ली भागात डोंगर माळरानावरील कोमुनिदाद जमिनीत बेकायदेशीर, विनापरवाना बंगले व प्लॉटस केले असून त्यासाठी ग्रामसभेत मोठा गहजब झाला. स्थानिकांनी संबंधितांना अटकाव केला. मात्र, शासन पातळीवर कोणतेही प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे स्थानिकांत संताप व्यक्त होत असून हा प्रकार न रोखल्यास तीव्र क्षनक्षोभास प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT