Illegal sand extraction Dainik Gomantak
गोवा

कामुर्लीतही रेतीचा उपसा!

नियमांचे उल्लंघन : पीर्णमध्येही मोठ्या प्रमाणात व्यवसाय

दैनिक गोमन्तक

म्हापसा: कामुर्ली भागात प्रामुख्याने तारवाडा (फेरीबोट परिसर) आणि भरणवाडा या भागात तसेच पीर्णमध्येही शापोरा नदीच्या पात्रातून गेल्या काही वर्षांपासून शासकीय नियमांचा तसेच कायद्याचा भंग करून रात्रीच्या वेळी होड्यांच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. याबाबत बंदर कप्तान खाते तसेच उद्योग व खाण खाते पाहणी करण्याचे केवळ नाटक करीत असल्याचा आरोप स्थानिक पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.

नदीतून अनधिकृतपणे रेती काढण्याचा हा व्यवसाय रात्रीच्या वेळी तेजीत असतो. रातोरात ती रेती ट्रकांमध्ये भरून पहाटेपर्यंत संबंधिक ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवली जात असते. शासकीय अधिकारी यासंदर्भात केवळ दिवसाच्या वेळी पाहणी करत असतात. रात्रीच्या वेळी पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची कोणतीही ठोस यंत्रणा राज्य सरकाराकडे नसल्याने अशा या बेकायदा व्यवसायिकांचे आयतेच फावते.

कामुर्ली परिसरात अडगळीच्या भागांत दिवसाढवळ्याही रेतीउपसा केला जातो. परंतु, त्या भागांत स्थानिकांची घरे दाटीवाटीने असल्याने त्या परिसरात प्रवेश करणेही शासकीय अधिकाऱ्यांना शक्य होत नाही. यदाकदाचित कारवाईसाठी शासकीय अधिकारी आलेच तर प्रमुख नाक्यावर तैनात केलेली त्या व्यवसायिकांची माणसे त्यासंदर्भात लगेच मोबाइल फोनवरून त्या व्यवसायिकांना वर्दी देत असतात व त्यामुळे कारवाई करणेही शासकीय अधिकाऱ्यांना शक्य होत नाही.

या बेकायदा व्यवसायाबाबत बहुतांश स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करीत असले तरी राजकीय वरदहस्त लाभलेल्या त्या बलाढ्य रेती माफियांच्या विरोधात उघडणपणे वक्तव्य करण्यास कुणीही धजावत नाही. दिवसा त्या होड्या अडगळीच्या ठिकाणी ठेवल्या जातात व रात्रीच्या वेळी ते व्यवसायिक स्वत:चा कार्यभाग उरकत असतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

90 टक्के कामगार परप्रांतीय

कामुर्लीत रेतीव्यावसायिक स्थानिक असले तरी त्यासंदर्भातील नव्वद टक्के कामगार परप्रांतीय आहेत. रेतीचा उपसा करणाऱ्या प्रत्येक होडीत किमान तीन कामगार आवश्यक असतात. त्यामुळे सध्या कामुर्लीत सुमारे साठ-सत्तर परप्रांतीय कामगार वास्तव्यास आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT