Goa Freedom Fighter Dainik Gomantak
गोवा

तेरेखोल किल्ल्याजवळ स्वातंत्र्यसैनिकांच्‍या स्मारकास मंजुरी

हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांचा सन्‍मान

दैनिक गोमन्तक

मोरजी : तेरेखोल किल्ल्याजवळ हुतात्मा हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक उभारण्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंजुरी दिली आहे. त्यासाठी 11 लाख 65 हजार 134 रुपये खर्च अपेक्षित आहे. सदर काम करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी आज दिला.

मिळालेल्या माहितीनुसार हिरवे गुरुजींचे स्मारक तयार करण्यासाठी म्हापसा येथील कंत्राटदाराला कामाची मंजुरी देण्यात आली होती. मात्र शेषनाथ वाडेकर यांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली होत नव्हत्या.

यासंदर्भात केरी पंचायत मंडळ, केरी विकास कल्याण परिसर शिक्षण संस्था, जीवनदायिनी संस्था यांना माहिती मिळताच गेल्या वर्षभरापासून दोन्ही हुतात्म्यांचे स्मारक तेरेखोल परिसरात व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.

शिवाय हिरवे गुरुजींचे कुटुंबीयही वारंवार सरकारला भेटून त्या ठिकाणी स्मारक उभारावे, अशी विनवणी करत होते. त्या विनवणीला मान देत सरकारने हिरवे गुरुजींचा स्मारक उभारावा यासाठी मंजुरी दिली होती. परंतु शेषनाग वाडेकर यांच्या पुतळ्यासंदर्भात ब्र काढला नव्हता.

दरम्यान, आमदार जीत आरोलकर यांनीही दोन्ही स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक होण्यासाठी सरकारदरबारी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांनी स्मारकांना मंजुरी दिल्याबद्दल आरोलकर यांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांनीही आरोलकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

कुटुंबीयांनी व्यक्त केली होती नाराजी

गोवामुक्ती लढ्यात 15 ऑगस्ट 1954 मध्ये शेषनाग वाडेकर आणि हिरवे गुरुजी यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. गोवा मुक्त होऊन जवळजवळ 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. 60 वर्षांचा महोत्सव वर्षभर राज्यात साजरा होत असताना ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तेरेखोल किल्ल्यानजीक स्मारक उभारण्यास सरकारला अपयश आले होते. त्यामुळे अनेकदा स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांनी तसेच नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

केरी पंचायत मंडळ व जीवनदायीचा पुढाकार

केरी पंचायत मंडळ आणि जीवनदायिनी संस्थेने याकामी पुढाकार घेतला होता. एका स्वातंत्र्यसैनिकाचे स्मारक उभारले तर त्याला आम्ही विरोध करू, शिवाय सरकारला जमत नसेल तर लेखी स्वरूपात कळवावे; त्याठिकाणी आम्ही दोन्ही हुतात्म्यांचे स्मारक उभारू, असा इशारा नागरिकांनी आणि जीवनदायिनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. आता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळे त्याठिकाणी उभारावे यासाठी मंजुरी दिल्यामुळे जीवनदायिनी संस्थेचे अध्यक्ष नाना उर्फ नारायण सोपटे केरकर यांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT