Sancoale Panchayat Election  Dainik Gomantak
गोवा

Sancoale News: गोव्यातील पहिलाच प्रकार! अर्जावर सही करण्यासाठी अनुमोदकच नाही, उमेदवाराची नाचक्की; दुसऱ्याची बिनविरोध निवड

Sancoale Panchayat News: सांकवाळ पंचायत प्रभाग २ चे पंच डेरिक वालिस यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या पदासाठी वालिस व मॉरेलिओ कार्व्हालो यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु कार्व्हालो यांच्या उमेदवारीस अनुमोदन देणारा दुसरा सदस्य न मिळाल्याने त्यांचा अर्ज रद्द झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: सांकवाळ पंचायत प्रभाग २ चे पंच डेरिक वालिस यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या पदासाठी वालिस व मॉरेलिओ कार्व्हालो यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु कार्व्हालो यांच्या उमेदवारीस अनुमोदन देणारा दुसरा सदस्य न मिळाल्याने त्यांचा अर्ज रद्द झाला. त्यामुळे वालिस यांची बिनविरोध निवड झाली.

साकवाळ पंचायत कार्यालयात सोमवार (दि.१४) रोजी सकाळी उपसरपंच निवडणूक प्रक्रियेची सुरुवात झाली. अर्जांची छाननी झाल्यानंतर अंतिम निकाल ११ वाजता जाहीर करण्यात आला. निवडणूक अधिकारी म्हणून निकोलस क्वाड्रोस उपस्थित होते.

निवडीनंतर माध्यमांशी बोलताना उपसरपंच डेरिक वालिस यांनी सांगितले की, लोकांना विश्वासात घेऊन विकासकामांवर लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच पंचायतीच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आम्ही सर्व पंच सदस्य एकसंध आहोत. आम्ही पंचायतीमध्ये विविध विकास प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन केले आहे. सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नवीन पंचायतघर होय. हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी पंचायत मंत्र्यांसोबत चर्चा करू. तसेच मुरगाव गटविकास अधिकारी कार्यालयात प्रलंबित असलेली अनेक कामे मंजूर करून घेऊन विकासकामे पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले.

माजी उपसरपंच गिरीश पिल्लई यांनी वालिस यांना शुभेच्छा देत पंचायतीतील ऐक्याचे महत्त्व सांगितले.आमची पंचायतीची ११ सदस्यीय टीम एकत्र राहून गावाच्या विकासासाठी काम करत राहील. पंचायत घराची फाइल तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित आहे, पण ती लवकरच मंजूर होईल, असे पिल्ले यांनी सांगितले.

राज्यातील पहिलाच प्रकार...

बिनविरोध निवडीबद्दल वालिस म्हणाले की, विरोधी उमेदवार मॉरेलिओ कार्व्हालो यांनी या पदासाठी अर्ज सादर केला होता, परंतु त्यांना अनुमोदन देणारा कोणीही मिळाला नाही. हे गोव्यातील राजकीय इतिहासात प्रथमच घडले आहे. यामुळेच माझी बिनविरोध निवड झाली.

ग्रामसभेत वाद नको; सरपंच

पिल्ले यांनी गावकऱ्यांना विनंती केली की, त्यांनी ग्रामसभा बैठकीत वाद घालण्याऐवजी आपले मुद्दे थेट पंचायतीकडे मांडावेत. आपण सर्व मिळून गावाच्या विकासासाठी काम करू शकतो. जर गावकऱ्यांना एखादा प्रकल्प नको असेल, तर त्यांनी आपली मते मांडावी, आणि आम्ही त्यास विरोध करून प्रकल्प रद्द करू, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT