Sancoale  Dainik Gomantak
गोवा

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

Sancoale Quennynagar: क्विनीनगर, सांकवाळ येथील मुख्य रस्त्याचा प्रवेश अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ काही वेळ तणाव निर्माण झाला. आमदार आंतोन वाझ यांनी हस्तक्षेप करीत समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रहिवाशांनी माघार घेतली.

गोमन्तक डिजिटल टीम

Sancoale Quennynagar News

वास्को: क्वीनीनगर, सांकवाळ येथील रहिवासी येथील मुख्य रस्त्याचा प्रवेश अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ आवाज उठवत रस्त्यावर उतरल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, आमदार आंतोन वाझ यांनी हस्तक्षेप करीत समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रहिवाशांनी माघार घेतली.

क्विनीनगर येथे ये-जा करताना अडचणी येत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली व कंत्राटदाराला धारेवर धरले. आमदार आंतोन वाझ यांनी त्वरित हस्तक्षेप केला. आंदोलक रहिवाशांची भेट घेतली आणि स्थानिक अधिकाऱ्यांना समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या. पुढील कारवाईमुळे सामान्य स्थिती पूर्ववत होईल या आश्‍वासनानंतर नागरिकांनी माघार घेतली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने क्विनीनगर ते बिर्ला दरम्यानच्या रस्त्याचे खोदकाम केल्याने तेथील रहिवासी व दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याप्रकरणी दखल घेताना कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्याशी चर्चा करून तेथील समस्या दूर करण्यासाठी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला.

व्यवसायावर परिणाम

क्विनीनगर ते बिर्ला दरम्यानच्या रस्त्याचे खोदकाम करण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे तेथील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. खोदकामामुळे त्या बाजूला ग्राहक व वाहनधारक फिरकत नसल्याने येथील दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. आमच्या व्यवसायावर ५० टक्के परिणाम झाला आहे. त्यामुळे आमच्यासमोर जगण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या ठिकाणी कोणत्या कारणासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात येत आहे याची कोणतीही माहिती दिलेली नाही. तेथील खोदकामाबद्दल विविध अफवा उठविल्या जात आहेत. काहींच्या मते सदर रस्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. तसे झाले तर आमच्या व्यवसायाचे काय हा प्रश्न असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

आमदारांकडून पाहणी

आमदार वाझ यांनी बुधवारी तेथील पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी राणे, कंत्राटदार, पंच जिम डिसोझा, दुकानदार आदी उपस्थित होते. दुकानदारांनी यावेळी आपल्या समस्या मांडल्या. याप्रकरणी योग्य तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होऊ नये, यासाठी कसा तोडगा काढता येईल यासंबंधी आमदार वाझ यांनी चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT