Bhutani Project Sancoale Fire Incident Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project Fire: कोट्यवधींच्या नियोजित गृह प्रकल्पाच्या डोंगराला आग; कोर्टाचा निर्णय धाब्यावर बसवून काम सुरु

Sancoale Fire Incident: सांकवाळ येथे डोंगरावर भूतानी प्रकल्पाच्या नियोजित जागेवर सकाळी आग लागल्याचे दिसल्याने स्थानिकांसह यंत्रणेचीही धावपळ उडाली.

Sameer Panditrao

Sancoale Bhutani Infra Project fire updates

वास्को: सांकवाळ येथे डोंगरावर भूतानी प्रकल्पाच्या नियोजित जागेवर सोमवारी (२४) सकाळी आग लागल्याचे दिसल्याने स्थानिकांसह यंत्रणेचीही धावपळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी वेर्णा पोलिस स्थानकात लेखी तक्रार करण्यात आली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रेमानंद नाईक यांनी सांगितले.

सांकवाळ येथील डोंगरावरील भूतानीच्या नियोजित मेगा हाउसिंग प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. मार्चमध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. तथापि, सोमवारी (ता. २४) सकाळी साडेसहाच्या दरम्यान तेथील डोंगरावर धूर येत असताना सुकोरिना नावाच्या महिलेला दिसला.

त्यामुळे ती त्याठिकाणी गेली असता, तेथे आग भडकलेली त्यांना दिसली. तसेच त्या ठिकाणी काहीजण काम करीत होते, तसेच चार मशिनांचा वापर करण्यात येत होता. त्यांनी याबाबत इतरांना माहिती दिली. तसेच पोलिस, अग्निशमन दल, तलाठी यांना कळविले.

ही माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तेथे आली. मात्र तोपर्यंत तेथील आग विझविण्यात आली होती. तेथे जाण्यासाठी रुंद रस्ता नसल्याने अग्निशमन दलाचा बंब महामार्गावरच ठेवण्यात आला, असे स्थानिकांनी सांगितले.

याप्रकरण स्थानिकांनी वेर्णा पोलिस स्थानकामध्ये तक्रार केली आहे. सामाजिक कार्यकर्ते पीटर डिसोझा, प्रेमानंद नाईक. माजी मंत्री एलिना साल्ढाणा तसेच इतर गावकरी उपस्थित होते.

साल्ढाणा यांची टीका

माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांनी गोव्यात कायदा नसल्याचा आरोप यावेळी केला. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही तेथे अद्याप कामे सुरू असल्याबद्दल त्यांनी आश्र्चर्य व्यक्त केले. प्रेमानंद नाईक यांनी सांगितले की, आपण वन खात्याच्या एका अधिकाऱ्याला फोनवरून माहिती दिली, तेव्हा आपण रजेवर असल्याचे त्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT