Court  Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project: भूतानी प्रकल्पाबाबत नवी अपडेट! सुनावणी पूर्ण; गोवा खंडपीठाकडून निकाल राखीव

Bhutani Project Sancoale: सुनावणीदरम्यान, या याचिकेवरील सर्व तर्क व पुरावे खंडपीठासमोर मांडण्यात आले, तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी देखील प्रकल्पासंबंधी भूमिका स्पष्ट केली. न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखून ठेवला.

Sameer Panditrao

पणजी: सांकवाळ येथील भूतानी इन्फ्रा प्रकल्पाविरोधातील जनहित याचिकेवरील अंतिम युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर पूर्ण झाला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत या प्रकरणासंदर्भातील सर्व बाजू सविस्तरपणे मांडल्या गेल्या.

या याचिका पीटर डिसोझा आणि गोवा बचाव अभियान यांनी दाखल केली होती. यामध्ये त्यांनी असा युक्तिवाद मांडला की, परमेश कन्स्ट्रक्शन्सच्या या भूतानी इन्फ्रा प्रकल्पास वैध पर्यावरण मंजुरी नसतानाही कोणतीही परवानगी कशी दिली गेली याची चौकशी करावी. तसेच प्रकल्पामुळे स्थानिक पर्यावरण आणि नागरिकांच्या हितावर होणाऱ्या परिणामांकडे न्यायालयाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली होती.

सुनावणीदरम्यान, या याचिकेवरील सर्व तर्क व पुरावे खंडपीठासमोर मांडण्यात आले, तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी देखील प्रकल्पासंबंधी भूमिका स्पष्ट केली. न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखून ठेवला असून, पुढील आदेशाची घोषणा नंतर होईल, असे स्पष्ट केले आहे.

स्थानिक नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्ते याचिकेच्या निकालाकडे विशेष लक्ष ठेवत आहेत, कारण हा प्रकल्प पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील भागात असून त्याचा परिणाम स्थानिक जीवनमानावर होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today Live News: गोव्यात पाच दिवस 'यलो अलर्ट'; मुसळधार पावसाची शक्यता

हमारी विरासत, आने वाली नस्लों को राह दिखाएंगी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत मनोहर पर्रीकरांच्या मार्गावर?

Mrunal Thakur Apologizes: बिपाशाला 'पुरुषांसारखी' म्हणणं मराठमोळ्या अभिनेत्रीला पडलं महागात; नेटकऱ्यांच्या टीकेनंतर मागितली माफी, म्हणाली- 'मी 19 वर्षांची...'

Asia Cup 2025: आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! शुभमन, सिराजबाबत प्रश्नचिन्ह; 'या' खेळाडूंना मिळणार डच्चू

Independance Day: 1946 साली मडगावात रणशिंग फुंकले; धुवांधार पावसात, जमावबंदीचा आदेश झुगारून गोमंतकीय एकत्र आले

SCROLL FOR NEXT