Hamid Dabholkar Dainik Gomantak
गोवा

'त्यांना वाटत असलेली भीती खरी'; सनातन संस्थेचा हमीद दाभोळकरांविरुद्धचा मानहानीचा खटला गोवा येथून कोल्हापुरात वर्ग

Bombay High Court: फोंडा येथील न्यायालयातून या कोल्हापूर न्यायालयात हे खटले वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Pramod Yadav

फोंडा: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर यांच्या विरोधात सनातन संस्थेने दाखल केलेला मानहानीचा खटला आता कोल्हापूर येथून चालणार आहे. हमीद दाभोळकर यांच्यासह काही वरिष्ठ पत्रकारांविरोधात सनातन संस्थेने मानहानीचा खटला दाखल केला आहे. सनातन संस्थेकडून जीवा धोका असल्याने खटला महाराष्ट्रात वर्ग करण्याची मागणी केली होती.

न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने ०३ सप्टेंबर रोजी याबाबत निर्णय दिला. सनातन संस्थेकडून जीवाला धोका असल्याची भीती याचिकाकर्त्यांनी केली होती. ही वाजवी आणि खरी असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवत मानहानीचे खटले गोव्यातून कोल्हापूर येथे वर्ग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फोंडा येथील न्यायालयातून या कोल्हापूर न्यायालयात हे खटले वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सनातन संस्थेने २०१७ आणि १८ मध्ये डॉ. हमीद दाभोलकर, पत्रकार निखिल वागळे यांच्यासह इतरांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येमागे संस्थेचा हात असल्याचा दावा करण्यात आला होता. यावरुन संस्थेची प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत खटला दाखल करण्यात आला होता. सनातने १० कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला होता.

२०२१ मध्ये याचिकाकर्त्यांनी फोंडा गोवा येथून खटला महाराष्ट्रात कोठेही वर्ग करण्यात यावा (मुंबई, पुणे किंवा कोल्हापूर) अशी मागणी केली होती. फोंडा येथे सनातनचे मुख्यालय असल्यामुळे त्यांनी जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. कोर्टाने देखील ही भीती खरी आणि वाजवी असल्याचे म्हटले आहे. 

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी ७.२० मिनिटांनी गोळ्या घोलून हत्या करण्यात आली होती. पुण्यातील ओमकारेश्वर पुलावर ही घटना घडली होती. याप्रकरणी मे २०२४ मध्ये एनआयएने दोघांना दोषी ठरवले होते. याप्रकरणातील इतर संशयितांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT