San Jose De Areal Shivaji Maharaj Statue Controversy Dainik Gomantak
गोवा

सां जुझे द आरियाल शिवरायांचा पुतळा वाद; आमदार क्रुझ सिल्वा यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

Pramod Yadav

San Jose De Areal Shivaji Maharaj Statue Controversy

शिवजयंतीच्या दिवशी सासष्टीतील सां जुझे द आरीयाल येथे शिवरायांच्या पुतळ्यावरुन वाद झाला. पुतळा उभारण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

पुतळा अनावरण केल्यानंतर झालेल्या वादासंबधित 20 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा मागे घेण्याची मागणी होत असून, वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

शिवरायांच्या पुतळ्याचे आनावरण केल्यानंतर झालेल्या वादाप्रकरणी दाखल झालेल्या 20 जणांविरोधातील गुन्हे मागे घेण्यात यावेत. तसेच, 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या घटनांची सखोल चौकशी केली जावी अशी, मागणी आमदार सिल्वा यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सां जुझे द आरीयाल येथे झालेला वाद कटाचा भाग होता, यामुळे गावातील सर्व धर्मीय लोकांमधील शांतता भंग होऊ नये यासाठी एकोप जपूया अशी भावना पाद्रीभाट येथे आयोजित सार्वजनिक सभेत उपस्थितांनी व्यक्त केली.

काही शक्ती गावातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप देखील यावेळी काही जणांनी केला. सां जुझे द आरीयाल गावात शिवाजी महाराज पुतळा अनावरण वादानंतर 20 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदण्यात आला होता.

त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.22) संपूर्ण गाव ज्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे, त्यांच्यासोबत आहे हे, दाखविण्यासाठी ही सभा बोलावली होती. यावेळी समर्थनार्थ मेणबत्ती मोर्चा काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT