Samuel Braganza death investigation report Dainik Gomantak
गोवा

Samuel Braganza Death Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Samuel Braganza Confidential Report: म्हापसा येथील २२ वर्षीय विद्यार्थी सॅम्युअल ब्रागांझा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.

Sameer Amunekar

म्हापसा: येथील २२ वर्षीय विद्यार्थी सॅम्युअल ब्रागांझा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे विशेष पोलिस अधीक्षक विश्वेश कर्पे यांनी आपला गोपनीय अहवाल उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांकडे सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या अहवालात म्हापसा पोलिस ठाण्यातील चौकशीचा घटनाक्रम, घटनेच्या दिवशीची स्थिती तसेच पोलिसांच्या भूमिकेबाबतचे निष्कर्ष नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे या अहवालानंतर पुढे कोणती प्रशासकीय अथवा शिस्तभंगाची कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

म्हापसा येथील गावसावाडो परिसरातील रहिवासी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या सॅम्युअल ब्रागांझा याचा रस्त्यावर कचरा टाकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची दखल घेत म्हापसा पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि पोलिसांच्या कारवाईच्या कथित भीतीमुळे तो मानसिक तणावाखाली गेला होता.

डोक्यावर, डोळ्याजवळ गंभीर जखमा

शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर या प्रकरणाने नवे वळण घेतले. अहवालात सॅम्युअलच्या डोक्यावर व डोळ्याजवळ गंभीर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले असून, त्यांपैकी काही जखमा मृत्यूपूर्वी २४ तासांच्या आत झालेल्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Forex Reserve Record: भारताच्या परकीय चलन साठ्याने रचला इतिहास! फॉरेक्स रिझर्व्ह 785 अब्ज डॉलर पार; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Horoscope 12 September 2026: सूर्याचं नक्षत्र बदलताच 'या' राशींचं चमकणार भाग्य, शनिवार ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

SCROLL FOR NEXT