Salvador do Mundo film shooting Dainik Gomantak
गोवा

चिता रचली, हंबरडा फुटला.., पण ते होते चित्रपटाचे शूटिंग; साल्वादोर पंचायत क्षेत्रातील घटना, पंचायतीला उशिरा जाग; अनेक जण संभ्रमात

film shooting: मृत्यूचे दृश्य रंगवले जाते, चिता रचली जाते आणि शुटिंग संपवून कलाकार निघूनही जातात... पण हे सर्व चित्रीकरण आपल्या नाकासमोर घडत असताना साल्वादोर द मुंद पंचायतीचे कारभारी नेमके कुठे होते? असा बोचरा प्रश्न आता ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: एखाद्या चित्रपटाचे शुटिंग चालते, तिथे मृत्यूचे दृश्य रंगवले जाते, चिता रचली जाते आणि शुटिंग संपवून कलाकार निघूनही जातात... पण हे सर्व चित्रीकरण आपल्या नाकासमोर घडत असताना साल्वादोर द मुंद पंचायतीचे कारभारी नेमके कुठे होते? असा बोचरा प्रश्न आता ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. दोन पावलांच्या अंतरावर काय घडतेय हे समजायला लोकप्रतिनिधींना चक्क दोन दिवस लागल्याने पंचायतीच्या कार्यक्षमतेवर सध्या पर्वरी मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.

खरी गंमत पुढेच आहे. ११ मे रोजी शुटिंग झाले, १२ तारीख उलटली आणि १३ मे रोजी अचानक काही पंचायत सदस्यांना जाग आली! एखाद्या चित्रपटातील क्लायमॅक्सप्रमाणे हे सदस्य समोर आले आणि गावात जणू काहीतरी अघटित घडल्याचा ''कांगावा'' सुरू झाला. ''येथे कुणाचा तरी मृतदेह आढळला आहे'' असा बनाव रचून पत्रकारांना बोलावण्यात आले.

जेव्हा पत्रकार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अर्धवट जळलेल्या मृतदेहाबद्दल विचारणा केली, तेव्हा पंच सदस्यांची भंबेरी उडाली. अखेर "ते चित्रपटाचे शुटिंग होते" हे सत्य समोर आले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्या आले आणि संबंधित शुटिंग ग्रुपच्या व्यक्तीने येऊन उरलेली लाकडे तिथून हटवली.

नेमका प्रकार काय?

११ मे रोजी साल्वादोर द मुंद पंचायत क्षेत्राच्या अगदी जवळ एका चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले. दृश्य होते अंत्यसंस्काराचे. हिंदू पद्धतीनुसार सरण रचले गेले, एका व्यक्तीला मृत दाखवून जाळण्याचे दृश्य चित्रित झाले आणि एका महिलेच्या रडण्याचा आक्रोशाने आसमंत दुमदुमून गेला. हे सर्व कॅमेऱ्यात कैद झाल्यावर शुटिंगचा ताफा तिथून निघून गेला. मागे उरली ती फक्त जळलेली लाकडे आणि शुटिंगचे अवशेष.

आमदारांकडून चौकशीचे आदेश

जिल्हा पंचायत सदस्य संदीप साळगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रकरणाचा सविस्तर उलगडा केला. ते म्हणाले, मानसचे अध्यक्ष गौतम वळवईकर यांनी मला फोन करून माहिती दिली की, बांधावर कुणीतरी मृत व्यक्तीला जाळले आहे. हा प्रकार नेमका काय आहे हे स्पष्ट नसल्याने मी तातडीने तिथे पोहोचलो.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत खुद्द आमदार रोहन खंवटे यांनीही मला चौकशी करून सविस्तर माहिती घेण्यास सांगितले होते. ११ मे रोजी हे चित्रीकरण झाले होते आणि लोकांचा आवाज झाल्याने १३ मे रोजी ते सर्व साहित्य भरून नेत होते. जेव्हा आम्ही तिथे विचारणा केली, तेव्हा शूटिंगच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ''सरपंचांनी आम्हाला स्वतः फोन केला होता आणि हे सर्व साहित्य भरून घेऊन जाण्यास सांगितले आहे. जर ही बाब सरपंचांना ठाऊक होती, तर ती इतकी गुपित का ठेवण्यात आली?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1970 चा शांत गोवा अन् 2026 चा हा 'अशांत' अवतार; नक्की काय बदललं गोमंतकात?

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाला 'बॅक टू बॅक' मोठा झटका, विराट पाठोपाठ आता 'हा' स्टार फलंदाजही जखमी; संघाला दुखापतीचं ग्रहण

Goa Bison Attack: "अचानक समोर आला अन्" सुर्ल-पाळी मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वाराला गव्यानं उडवलं! स्थानिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण!

विवाहानंतर नाव बदलणार आहात? मग 'हा' नवीन नियम आधी जाणून घ्या, नाहीतर सरकारी कार्यालयांचे खावे लागतील चकरा

DA Hike: महागाई भत्त्यावर सुद्धा टॅक्स भरावा लागतो? 50 लाख कर्मचाऱ्यांसाठी आयकर विभागाचा काय आहे नियम? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT