Goa Theft Case Canva
गोवा

Saligao Theft: घरमालकाच्या मोबाईलवरून 'ऑनलाईन' चोरी! गोव्यातील अजब प्रकार; संशयिताच्या कर्नाटकमध्ये आवळल्या मुसक्या

Saligao Crime News: साळगाव येथे घरमालकाची सव्‍वालाख रुपये रकमेसह दीड लाखाच्या मुद्देमालाची चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित अरुण परशुराम लमाणी (२१, बागलकोट-कर्नाटक) यास अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Saligao Theft News

म्हापसा: साळगाव येथे घरमालकाची सव्‍वालाख रुपये रकमेसह दीड लाखाच्या मुद्देमालाची चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित अरुण परशुराम लमाणी (२१, बागलकोट-कर्नाटक) यास अटक केली. हा प्रकार सप्टेंबरमध्ये घडला होता.

घरमालक फिर्यादी दुमिंगोस डिसोझा यांच्याकडे संशयित भाडेकरू म्हणून राहत होता. भाड्याची खोली सोडून जाताना त्‍याने फिर्यादींच्या घरातील ५ हजार रूपये रोख रक्कम तसेच सोन्याची कर्णफुलांची जोडी चोरून नेली होती. तसेच २२ एप्रिल २०२४ रोजी फिर्यादींचा मोबाईल घेऊन त्यावर ‘फोन-पे’ अ‍ॅप डाऊनलोड केले आणि आपल्या एका मित्राच्या खात्यात त्‍यामार्फत १ लाख २० हजार रूपये रक्कम हस्तांतरीत केली.

संशयित घरात चोरी करून गेल्यानंतर फिर्यादींच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी संशयिताला फोन करून चोरीचा मुद्देमाल परत करण्याची विनंती केली. मात्र शेवटी संशयित आरोपीचा संपर्क होत नसल्याचे पाहून त्यांनी साळगाव पोलिसांत तक्रार दिली होती. त्यांनतर पोलिसांनी बागलकोट येथे जाऊन तेथील पोलिसांच्‍या सहकार्याने संशयित परशुराम लमाणी याच्‍या मुसक्‍या आवळल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camurlim Gram Sabha: कामुर्ली ग्रामसभेत राडा! उपसरपंच महिलेला तरुणाकडून मारहाण; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Anjuna Gramsabha: हणजूण मारहाण प्रकरण चिघळले; दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल!

Pilgao Mining Protest: पिळगावचे वातावरण तापले; आंदोलनात महिलांची उडी, तिसऱ्या खनिज वाहतूक बंदच

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

Goa Live News: बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 295 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT