गोव्यात रुग्णवाहिकेचा चालक नसल्यामुळे तीन तास रुग्णाची तळमळ! पुन्हा गलथान कारभार

Goa News: रुग्‍णवाहिका उपलब्‍ध नसल्‍यामुळे हाॅस्‍पिसियोतील रुग्‍णांची परवड सुरूच असून शुक्रवारी आणखी एका रुग्‍णाला या अनागोंदी कारभाराचा फटका बसला. या तरुणाचा पाय फ्रॅक्‍चर झाला होता.
Goa News: रुग्‍णवाहिका उपलब्‍ध नसल्‍यामुळे हाॅस्‍पिसियोतील रुग्‍णांची परवड सुरूच असून शुक्रवारी आणखी एका रुग्‍णाला या अनागोंदी कारभाराचा फटका बसला. या तरुणाचा पाय फ्रॅक्‍चर झाला होता.
Goa Ambulance Issue Dainik Gomantak
Published on
Updated on

Margao Hospital Patients Face Hardship Due to Lack of Ambulances

मडगाव: रुग्‍णवाहिका उपलब्‍ध नसल्‍यामुळे हाॅस्‍पिसियोतील रुग्‍णांची परवड सुरूच असून शुक्रवारी आणखी एका रुग्‍णाला या अनागोंदी कारभाराचा फटका बसला. या तरुणाचा पाय फ्रॅक्‍चर झाला होता. शस्‍त्रक्रियेसाठी त्‍याला गोमेकॉत नेणे गरजेचे होते. मात्र, रुग्‍णवाहिका नसल्‍याने त्याला तीन तास तळमळत राहावे लागले.

हॉस्‍पिसियोत शस्‍त्रक्रिया करणे शक्‍य नसल्‍याने त्‍याला गोमेकॉत हलविण्‍याचा निर्णय घेतला. हॉस्‍पिसियोच्‍या आवारात रुग्‍णवाहिका होत्‍या. मात्र, त्‍या चालविण्‍यासाठी चालक उपलब्‍ध नव्‍हते. मात्र, १०८ ची रुग्‍णवाहिकाही तिथे पोचली नव्‍हती.

Goa News: रुग्‍णवाहिका उपलब्‍ध नसल्‍यामुळे हाॅस्‍पिसियोतील रुग्‍णांची परवड सुरूच असून शुक्रवारी आणखी एका रुग्‍णाला या अनागोंदी कारभाराचा फटका बसला. या तरुणाचा पाय फ्रॅक्‍चर झाला होता.
Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

माजी आमदारांचे सहकार्य पण..

दोन दिवसांपूर्वी रुग्‍णवाहिका नसल्‍यामुळे गर्भवती महिलेला त्रास सोसावा लागल्याची बातमी ‘गोमन्‍तक’ने आजच प्रसिद्ध केली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एक घटना घडली. रुग्‍णवाहिका नसल्‍यामुळे हतबल झालेल्या तरुणाच्‍या वडिलांनी फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक़ यांच्‍याशी संपर्क साधला. नाईक यांनी खासगी रुग्‍णवाहिका पाठविली; पण तोपर्यंत १०८ ची रुग्‍णवाहिका आल्‍यामुळे त्‍याला गोमेकॉत हलविले.

नागरिकांना होणाऱ्या त्रासाविषयी सरकार असंवेदनशील आहे. दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळात रुग्‍ण आणि नातेवाईकांचे हाल ही नित्‍याचीच बाब झाली आहे. यात आराेग्‍यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी लक्ष घालावे आणि ‘मडगावचा आवाज’ संघटनेने सुचविलेल्‍या उपाययोजनांवर कार्यवाही करावी.

प्रभव नायक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com