Saligao Police Arrested women Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : पाहुणी म्हणून आली, अन् दागिने घेऊन पसार झाली; गोव्यातील घटनेचे सिंधुदुर्ग कनेक्शन

महिलेला अटक, चोरीचे दागिने हस्तगत

Rajat Sawant

काही दिवसांपूर्वी साळगाव येथे एका घरात 2.90 लाखांचे दागिने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून संशयित महिलेविरूध्द भादंसंच्या 380 कलमान्वये गुन्हा नोंद केला. संशयिताला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादींच्या घरी संशयित महिला आली होती. यावेळी संशयित महिलेने 3 ते 4 एप्रिल दरम्यान फिर्यादीच्या घरातील कपाटातील मंगळसूत्र, दोन लॉकेट असलेली सोनसाखळी, दोन जोड्या कर्णफुले, पाटली, 5 बांगड्या, नथ व दोन अंगट्या मिळून 2 लाख 90 हजार रूपये किंमतीचे दागिने चोरी केले.

घरात चोरी झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात येताच साळगाव पोलिसांत तक्रार केली. फिर्यादींनी याप्रकरणी संशयित महिलेवर संशय व्यक्त केला होता.

पोलिसांनी संशयित महिलेचा शोध घेत ताब्यात घेतले. प्राजक्ता खावनेकर (कुडाळ, सिंधुदूर्ग) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी संशयिताकडून चोरीची 37 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Fire: सत्तरीत आगीचे तांडव! भीषण आगीत घर भस्मसात, 15 लाखांचं नुकसान; आगीचं कारण अस्पष्ट Watch Video

Russian Tourist Murder: 2 रशियनांच्या हत्येनंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये; पर्यटक व्हिसावर क्लब-पबमध्ये काम करणाऱ्यांची होणार झाडाझडती

पालकांनो, मुलांच्या हाती फोन देताय? त्याआधी ऑन करा 'या' 5 सेटिंग्ज, अश्लील कंटेंटला बसेल कायमचा लगाम

VIDEO: 'मला वाटलं होतं खूप घाण असेल, पण...' भारतीय रेल्वेच्या प्रवासाने विदेशी तरुणी भारावली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: RCB फॅन्ससाठी मोठी बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने होणार की नाही? कर्नाटक सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT