साळगाव: गोव्यात वाढत्या रस्ते अपघातांनी पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. साळगाव येथे रस्त्यावर झालेल्या दोन मोटरसायकलमधल्या भीषण अपघातात ओंकार करापूरकर (२५, थिवी) आणि मोहम्मद फ्राझ (३०, आसाम) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात इतर दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राज्याच्या वाढत्या अपघात दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गोवा विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सादर केलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ पासून आतापर्यंत गोव्यात १७०० हून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात ८४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. आमदार कार्लोस फेरेरा आणि दाजी साळकर यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. २०२५ या वर्षातही आतापर्यंत १३५ लोकांचा अपघाती मृत्यू झाल्याचे त्यांनी नमूद केले.
वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने राज्यभरात ४३ 'ब्लॅक स्पॉट' निश्चित केली आहेत. हे असे ठिकाण आहेत जिथे रस्त्यांची रचना खराब आहे किंवा ती जास्त वेगाच्या क्षेत्रांमध्ये येतात. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) सहकार्याने या 'ब्लॅक स्पॉट'वर सुरक्षितता सुधारण्यासाठी काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वाढते अपघात आणि मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नियमितपणे अंमलबजावणी मोहीम राबवत आहे. या वर्षात आतापर्यंत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याबद्दल २,६०० हून अधिक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल २,५८६ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.