Cricket Tournament Dainik Gomantak
गोवा

Premier League Cricket Tournament: शेवटचा साखळी सामना ठरणार निर्णायक; साळगावकर आणि जीनो क्लबमध्ये चुरशीची लढत

Salgaonkar Cricket Club Vs Geno Sports Club: साळगावकर क्लब आणि जीनो क्लब यांच्यातील अखेरचा साखळी सामना 4 ते 6 एप्रिल या कालावधीत पर्वरी येथे खेळला जाईल.

Manish Jadhav

Premier League Cricket Tournament: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग (जीपीएल) क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपदासाठी साळगावकर क्रिकेट क्लब आणि जीनो स्पोर्टस क्लब यांच्यात घमासान पाहायला मिळणार आहे. त्यांच्यात होणारा अखेरचा साखळी सामना निर्णायक ठरेल. सध्या उभय संघांत फक्त एका गुणाचा फरक आहे. साळगावकर क्लब आणि जीनो क्लब यांच्यातील अखेरचा साखळी सामना 4 ते 6 एप्रिल या कालावधीत पर्वरी येथे खेळला जाईल. सध्या साळगावकर क्लबचे 22, तर जीनो क्लबचे 21 गुण आहेत.

दरम्यान, स्पर्धेत सोमवारी चिखली-वास्को येथील मैदानावर सागर उदेशी (5-66) आणि गगनदीप (3-70) यांनी मडगाव क्रिकेट क्लबचा दुसरा डाव 191 धावांत गुंडाळल्यामुळे साळगावकर क्लबने सामना डाव आणि 154 धावांनी जिंकला आणि बोनस गुणाचीही कमाई केली. पर्वरी येथे मोहित रेडकर (6-63) व प्रतीक्षेनंतर मिळालेल्या अल्प संधीचे सोने केलेला डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर (3-28) यांनी धेंपो क्लबचा दुसरा डाव 154 धावांत संपुष्टात आणला. त्यामुळे जीनो क्लबने सामन्यात 142 धावांनी विजय मिळवला. ऑफस्पिनर मोहित याने दोन्ही डावांत मिळून 155 धावांच्या मोबदल्यात 13 गडी बाद केले.

दुसरीकडे, सांगे मैदानावर पणजी जिमखाना आणि चौगुले स्पोर्टस क्लब यांच्यातील सामना रंगतदार ठरला. पणजी जिमखान्याचे विजयासाठी प्रयत्न अखेर हुकले. तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी खेळ थांबला, तेव्हा 253 धावांच्या आव्हानासमोर चौगले क्लबची 8 बाद 177 अशी स्थिती होती. हा सामना अनिर्णित राहिला.

संक्षिप्त धावफलक

1) साळगावकर स्पोर्टस क्लब, पहिला डाव: 9 बाद 427 घोषित विजयी विरुद्ध मडगाव क्रिकेट क्लब, पहिला डाव: 82 आणि दुसरा डाव (5 बाद 96 वरुन): 64.3 षटकांत सर्वबाद 191 (योगेश कवठणकर 58, उदित यादव 32, सागर उदेशी 5-66, गगनदीप 3-70).

2) जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव: 309 आणि दुसरा डाव: 60 षटकांत 7 बाद 241 घोषित (पुखराज मान 94, दर्शन मिसाळ 39, विकास सिंग 5-98) विजयी विरुद्ध धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव: 254 आणि दुसरा डाव: 43.2 षटकांत सर्वबाद 154 (कौशल हट्टंगडी 35, विकास सिंग 41, मोहित रेडकर 6-63, अमूल्य पांड्रेकर 3-28).

3) पणजी जिमखाना, पहिला डाव: 375 आणि दुसरा डाव: 23 षटकांत 3 बाद 165 घोषित (जय आहुजा 40, ईशान गडेकर 61, शिवेंद्र भुजबळ नाबाद 31) अनिर्णित विरुद्ध चौगुले स्पोर्टस क्लब, पहिला डाव (8 बाद 242 वरून): 88.2 षटकांत सर्वबाद 288 (मंथन खुटकर 174) आणि दुसरा डाव: 46 षटकांत 8 बाद 177 (शंतनू नेवगी 45, मंथन खुटकर 24, हर्ष गोयल 52, कीथ पिंटो नाबाद 22, शुभम देसाई 3-60, सत्यजीत बच्छाव 4-45).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

"रागाच्या भरात दिली होती तक्रार", सख्ख्या बहिणीची साक्ष फिरली, विनयभंगाच्या आरोपातून संशयित भावाची निर्दोष मुक्तता

Goa Drug Case: गोव्यातील 'नाईट पार्टी' ठरली अखेरची! इंदूरच्या 21 वर्षीय तरुणाचा हणजूणमध्ये संशयास्पद मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस? तपास सुरु

SCROLL FOR NEXT