salcete child kidnapping cases, Dainik Gomantak
गोवा

Salcete Kidnapping Cases: चिंताजनक! सासष्‍टीतून 7 अल्‍पवयीन मुलांचे अपहरण; काही प्रकरणांमध्ये संशयितांना अटक

Salcete child kidnapping cases: कुंकळ्‍ळी, मायणा-कुडतरी आणि वेर्णा पोलिस स्‍थानकाच्‍या अंतर्गत ही प्रकरणे नोंद झाली आहेत. २८ फेब्रुवारी राेजी कुंकळ्‍ळीतून एका अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करण्‍यात आले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: सासष्‍टी तालुक्‍यासाठी लहान मुलांची वाढती अपहरणे हा चिंतेचा विषय बनला असून जानेवारी ते आतापर्यंत एकूण अशा सात प्रकरणांची नाेंद झाली असल्‍याने अवघ्‍या सव्‍वादोन महिन्‍यांत हे प्रमाण बरेच वाढले असून यातील बहुतेक प्रकरणे मुलींच्‍या अपहरणाशी संबंधित आहेत.

कुंकळ्‍ळी, मायणा-कुडतरी आणि वेर्णा पोलिस स्‍थानकाच्‍या अंतर्गत ही प्रकरणे नोंद झाली आहेत. २८ फेब्रुवारी राेजी कुंकळ्‍ळीतून एका अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करण्‍यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी मूळ कर्नाटकातील मात्र सध्‍या करंजाळे येथे राहणाऱ्या एडवीन रोनाटा याला अटक केली होती.

मायणा-कुडतरी पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत अशाप्रकारची दोन प्रकरणे घडली असून एका प्रकरणात नेसाय येथून एका अल्‍पवयीन मुलीचे अपहरण केल्‍याची तक्रार तिच्‍या वडिलांनी केली होती. या प्रकरणात पंकज निशाद याला अटक करण्‍यात आली. अशाचप्रकारचे आणखी एक प्रकरण रालोय-नेसाय येथे झाले होते.

वेर्णा पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीतही अशी दोन प्रकरणे घडली असून ३१ जानेवारी रोजी कुठ्ठाळी येथून एका अल्‍पवयीन मुलीचे अपहरण केल्‍याची तक्रार तिच्‍या आईने दिली होती. आणखी एक प्रकरण सांकवाळ येथे झाले असून १७ फेब्रुवारी रोजी एका अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करण्‍यात आले होते.

या सव्‍वादोन महिन्‍यांच्‍या काळात दोन लहान मुलांचेही अपहरण झाल्‍याच्‍या तक्रारी नोंद झाल्‍या असून ही दाेन्‍ही प्रकरणे वास्‍को रेल्‍वे पोलिस स्‍थानकाच्‍या अंतर्गत नाेंद झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT