Salcete Gauri Pujan Dainik Gomantak
गोवा

Goa Gauri Pujan: सत्तरीत गौरी पूजन उत्सव साजरा

Valpoi Gauri Pujan: यंदा मुहुर्तानुसार गौरी पूजन सहाव्या दिवशी आले आहे

दैनिक गोमन्तक

Valpoi Gauri Pujan: सत्तरी तालुक्यातील गावागावांत आज पारंपरिक गौऱी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात हा उत्सव चतुर्थीच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो, तर काही गावांत मुहुर्तावर हा उत्सव साजरा करण्यात येतो.

यंदा मुहुर्तानुसार गौरी पूजन सहाव्या दिवशी आले आहे. त्यामुळे काही भागांत सोमवारी हा उत्सव (Festival) साजरा करण्यात येणार आहे. वेळूस, कोपार्डे, म्हाऊस, वेळगे, झर्मे, दाबे, सावर्शे, मासोर्डे, नगरगाव, दाबोस यासह इतर गावांत हा साजरा करण्यात आला.

कसे करतात गौरी पूजन?

* प्रातःकाळी सुवासिनी विहिरीवर किंवा नदीवर जाऊन कळसात गौरी पूजनासाठी पाणी घेऊन येतात. नंतर त्याची विधिवत पूजा केली जाते.

* देवीसमोर ओवशे तयार केले जातात. हळदीच्या पानावर पदार्थ भरून त्याची पूजा केली जाते.

* ओवशे मंदिरात, घरातील देव्हाऱ्यात ठेवून, घरातील प्रमुखाला देऊन झाल्यानंतर सुवासिनी प्रत्येक घरात जाऊन ओवशे वाटतात.

* सुवासिनी घरातील गणेशाचे तसेच घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात. नंतर घरी येऊन महाप्रसाद करतात.

* संध्याकाळी गौरीचे पाणी ज्या ठिकाणाहून आणले, तिथे विसर्जित केल्या जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT