shri someshwar temple festival kurdi Dainik Gomantak
गोवा

Kurdi: श्रीस्थळ-कुर्डीचा उत्सव लांबणीवर! सोमेश्‍‍वर देव अजूनही पाण्‍याखालीच; उत्सव समितीची घोषणा

Shri someshwar temple kurdi: वर्षभरात सुमारे दहा महिने साळावली धरण्याच्या पाण्याखाली असणारा श्रीस्थळ-कुर्डी हा परिसर मे महिन्यात पाणी ओसरल्यानंतर उघड्यावर पडतो.

Sameer Panditrao

सांगे: साळावली धरणातील पाणी अजूनही न ओसरल्‍याने कुर्डी गावातील श्रीस्थळ येथील श्री सोमेश्‍‍वर देवस्थानाचा यंदाचा रविवारी १८ मे रोजी होणारा वार्षिक उत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. त्यासंबंधीची अधिकृत घोषणा उत्सव समितीने केली आहे.

वर्षभरात सुमारे दहा महिने साळावली धरण्याच्या पाण्याखाली असणारा श्रीस्थळ-कुर्डी हा परिसर मे महिन्यात पाणी ओसरल्यानंतर उघड्यावर पडतो. त्‍यामुळे प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या रविवारी कुर्डी गावात पूर्वी वास्तव्याला असलेले श्री सोमेश्‍‍वराचे भक्तगण श्रीस्थळ येथे एकत्र येऊन एका दिवसाचा उत्सव साजरा करतात.

उत्सवाला धरणामुळे विस्थापित झालेले व गोव्याच्‍या विविध भागात वास्तव्याला असलेले सुमारे आठ ते दहा हजार भक्तगण तसेच कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात असलेले देवाचे कुळावी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. गानतपस्विनी कै. मोगुबाई कुर्डीकर व त्यांची कन्या गानसरस्वती कै. किशोरीताई आमोणकर यांचे जन्मगाव असल्याने गोव्यांतील नामांकित गायक, वादक या उत्सवाला उपस्‍थिती लावून श्री सोमेश्‍‍वरचरणी आपली कला पेश करतात.

उत्‍सवाची तयारी करण्‍यात अनंत अडचणी

तूर्त मंदिराकडे जाणारा रस्ता शीर-कुर्डी येथे पाण्याखाली आहे. त्यामुळे श्रीस्थळ येथे वाहने नेणे शक्य नाही. या उत्सवाची तयारी अगोदर पंधरा दिवसांपासून सुरू असते. पण मंडप उभारणे व इतर सामग्री नेणे शक्य नसल्याने उत्सव पुढे ढकलण्याशिवाय समितीपुढे पर्याय नव्‍हता.

पाणी ओसरणे कठीणच

यंदा थोडेसेच पाणी ओसरले आहे. श्री सोमेश्‍‍वर मंदिर जरी पाण्यावर आले असले तरी मंदिरापर्यंत जाणारा मुख्य रस्ता अजून पाण्याखाली आहे. पुढील आठ ते पंधरा दिवसांत पाणी ओसरण्याची शक्यता कमीच आहे. त्‍यामुळे यंदाचा १८ मे रोजी होणारा नियोजित उत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. कदाचित उत्सव साजरा करणे शक्य असल्यास पुढील तारीख लवकरच जाहीर करू, असेही कळविण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

''वीज खात्यान जाय तशे फोडून दवरल्यात रस्ते'' खड्डेमय रस्त्यांवरून पर्यटनमंत्र्यांचा 'वीजमंत्र्यांवर' निशाणा; Watch Video

भाजपची दादागिरी खपवून घेणार नाही; आपच्या कार्यकर्त्यांना मंत्री कामतांच्या जवळच्या व्यक्तीने धमकावल्याचा पालेकरांचा आरोप Video

SCROLL FOR NEXT