Sal villagers need water pump for well Dainik Gomantak
गोवा

साळ देवस्‍थानच्‍या विहिरीला हवा पंप...

ग्रामस्‍थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

दैनिक गोमन्तक

दिलीप देसाई

साळ: ‘पिकते तिथे विकत नसते’ अशी स्थिती डिचोली तालुक्यातील साळ या गावाची आहे. येथील श्री माडवेश्वर क्षेत्रातील बंधाऱ्यातील पाणी उपसा केंद्राद्वारे पाणी उपसून आमठाणे बंधाऱ्यात सोडले जाते व तेथून ते अडवलपाल येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात पोचविले जाते. तेथून शुद्धीकरण करून साळवासीयांना मुबलक पाणी नळाद्वारे पोचविले जाते. तरीसद्धा येथील ग्रामस्‍थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

गडेत्सव हा या गावाचा सर्वदूर प्रसिद्ध असा उत्‍सव. हा उत्सव जरी तीन रात्री असला तरी येणारे हजारो भाविक, पाहुणे, दुकानवाले येथे पाहुणचार घेतात. या सर्वांना पाण्याच्‍या टंचाईला सामोरे जावे लागते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री सुदिन ढवळीकर व आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी जातीने लक्ष देऊन जलशुद्धीकरण प्रकल्प योजना अमलात आणावी, अशी मागणी होत आहे. खालचावाडा येथील श्री भूमिका मंदिराशेजारी देवीच्या विहिरीला एक पंप होता. त्याद्वारे पूर्वी गावाला पाणीपुरवठा करण्‍यात येत होता. पण मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण करतेवेळी तो काढण्यात आला. पाणीपुरवठा खात्याने येथील विहिरीचा पंप बसून ही योजना कार्यान्वित करावी, जेणेकरून अडवलपालहून साळवासीयांना पाणीटंचाई सामना करावा लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT