Temple Donation Box Dainik Gomantak
गोवा

Sal Temple Robbery: उसप येथील लक्ष्मी नारायण मंदिरात चोरी

Sal Temple Robbery: देवस्थान समितीने त्वरित या घटनेची माहिती डिचोली पोलिसांना दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Sal Temple Robbery: साळ, भटवाडी - उसप, डिचोली येथील श्री लक्ष्मी नारायण देवस्थानात रविवारी पहाटे काही चोरट्यांनी देवस्थानची फंड पेटी पळवली. त्यातील पैसे घेऊन फंडपेटी जवळच फेकून दिली.

देवस्थानचे पुजारी पूजा करायला पहाटे आले असता त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यांनी ही बाब देवस्थान समितीच्या लक्षात आणून दिली.

देवस्थान समितीने त्वरित या घटनेची माहिती डिचोली पोलिसांना दिली. माहिती मिळताच डिचोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले व चोरीचा पंचनामा केला.

घटनेची माहिती स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले. आमदार शेट्ये यांनी तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे देवस्थान समितीला आश्वासन दिले.

वर्षभरात या देवस्थानात दुसऱ्यांदा चोरीचा प्रकार घडला असून यापूर्वीही चोरी होऊन अज्ञातांनी फंड पेटी फोडून पैसे लंपास करून फंड पेटी फेकून दिली होती.

या वर्षात या देवस्थानात दुसऱ्यांदा चोरीचा प्रकार घडला आहे. डिचोली पोलिस अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT