Sakshi Kale Won Bronze Athletics Dainik Gomantak
गोवा

Athletics Medal: साक्षी काळेचे अॅथलेटिक्समध्ये ऐतिहासिक ब्राँझ! पदक जिंकणारी पहिली गोमंतकीय क्रीडापटू

खेलो इंडिया पॅरा राष्ट्रीय स्पर्धा

Kavya Powar

Sakshi Kale Won Bronze Athletics: खेलो इंडिया पॅरा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली गोमंतकीय खेळाडू हा मान तिस्क-उसगाव येथील साक्षी काळे हिने संपादन केला. सोमवारी तिने नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर टी ११-१२ प्रकारातील महिलांच्या १०० मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकले.

पहिली खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा सध्या दिल्लीत सुरू आहे. यावर्षी जानेवारीत गुजरातमधील नादियाड येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा क्रीडा स्पर्धेत १८ वर्षीय साक्षीने १०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते.

राष्ट्रीय पातळीवरील चमकदार कामगिरीमुळे तिची खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. अंधत्व तिच्या यशाच्या आड येऊ शकले नाही आणि खेलो इंडिया स्पर्धेसाठी मिळालेली संधी सार्थ ठरविली.

आत्मविश्वासाच्या बळावर पदक

`माझी ही पहिली खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धा असल्याने प्रतिस्पर्धी धावपटूंबाबत मला फारशी माहिती नव्हती. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होताना आत्मविश्वास उंचावलेला होता. गुडघ्याची जुनी दुखापतही काही प्रमाणात सतावत होतीच.

त्याकडे दुर्लक्ष करून मी जिद्दीने सुसाट धावले. हे राष्ट्रीय पदक खूप मौल्यवान आहे,` असे साक्षी हिने सोमवारी नवी दिल्ली येथून सांगितले. क्रीडा खात्याचे विवेक पवार स्पर्धेत गोव्याचे चेफ द मिशन आहे. राज्यासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या साक्षीचे विवेक यांनी अभिनंदन केले.

वडिलांसमोर जिंकलेले पहिलेच पदक

धाडसी, जिगरबाज साक्षीला तिच्या पालकांनी मैदानावरील वाटचालीत सदोदित प्रोत्साहन दिलेले आहे. साक्षी अॅथलेटिक्स ट्रॅकवरून वेगाने धावताना, तसेच पदके जिंकतानाचा अनुभव तिची आई मिलन यांनी घेतलेला आहे, परंतु वडील ईश्वर यांनी कधीच साक्षीला मैदानावर धावताना पाहिलेले नव्हते, यावेळी दुग्धशर्करायोग जुळून आला.

मी जिंकताना आईने मला पाहिले आहे, पण वडिलांनी माझी शर्यत पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांच्या उपस्थितीत मी राष्ट्रीय पदक जिंकू शकले ही भावना अत्त्युच्च आहे. हे पदक मी वडिलांना अर्पित करत आहे,` असे भावूक स्वरात साक्षी म्हणाली. मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी वडील ईश्वर व आई मिलन खास दिल्लीत दाखल झालेले आहेत. साक्षीने पदक जिंकून पालकांची प्रवासातील दगदग सुसह्य केली.

अंधत्वाला दिली मात

साक्षी काळे हिने अंधत्वला मात देत ट्रॅक अँड फिल्डवर मोठा पराक्रम साधला आहे. २०२२ मध्ये तिने ओडिशातील भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय सीनियर पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत लांबउडीत सुवर्ण, तर २०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते.

यावर्षी जानेवारीत गुजरातमधील नादियाड येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ती १०० मीटर शर्यतीत रौप्यपदकाची मानकरी ठरली. यावर्षीच मे महिन्यात बंगळूर येथे झालेल्या पाचव्या इंडियन ओपन पॅरा अॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत साक्षीने १०० मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावले होते. तिचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT