Saint Francis Xavier Exposition Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: यानंतर कधीच होणार नाही का 'झेवियर अवशेष दर्शन सोहळा'? मंत्री आलेक्स सिक्वेरांनी केले स्पष्ट

Goa Saint Francis Xavier Exposition: यंदा जगभरातून तसेच देशाच्या विविध राज्यांतील भाविकही आले

Akshata Chhatre

Last Day Of Saint Francis Xavier Exposition Ceremony Goa

जुने गोवे: गोयेंचो सायब म्हणजेच संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेष प्रदर्शनाचा आज (शनिवार, ४ जानेवारी) हा शेवटचा दिवस आहे. संत फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेष दर्शन सोहळ्याला शुक्रवारपर्यंत ७५ लाख भाविकांनी उपस्थिती लावल्याची नोंद झाली आणि आज (०४ डिसेंबर) शेवटच्या दिवशी ८० लाख भाविक पवित्र अवशेषांचे दर्शन घेतील असा अंदाज आहे. यंदा जगभरातून तसेच देशाच्या विविध राज्यांतील भाविकही आले, अशी माहिती सरकारी आयोजन समितीचे उपाध्यक्ष तथा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिली.

मुख्यमंत्र्याची उपस्थिती:

सोहळ्याच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी भेट दिली होती. त्याविषयी विचारणा केल्यावर सिक्वेरा म्हणाले, ध्वनी व प्रकाशयोजनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते. यंदा तो कार्यक्रम अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. पवित्र अवशेष दर्शन सोहळा आयोजन करण्यात सरकार चर्चला सहकार्य करते.

गेल्या अनेक आयोजनांतून जाणवत आलेल्या त्रुटी दूर करत, आयोजनात सुधारणा करत हा प्रवास सुरू आहे. यंदा एवढ्या मोठ्या संंख्येने जगाच्या कानाकोपऱ्यातून विविध धर्मांचे लोक येऊनही गोंधळ झाला नाही.

सर्वांना सुरळीतपणे पवित्र अवशेषांचे दर्शन घेता आले. सुधारण्यास प्रत्येक ठिकाणी वाव असतो. या ठिकाणी सरकारची भूमिका ही साहाय्य करण्याची आहे. चर्च संस्था या सोहळ्याचे आयोजक आहे.

अंतिम सोहळा असल्याची केवळ अफवाच...

यंदा पवित्र अवशेष दर्शन सोहळ्यासाठी सत्तरेक लाख भाविक येतील, असा अंदाज होता. त्यानुसार व्यवस्था केली होती, मात्र, हा आकडा आता पार झाला आहे. शेवटच्या १५ दिवसांत या सोहळ्यात सहभागी होता यावे यासाठी यंदा दर्शनाची वेळ चर्चच्या संमतीने दोन तासांनी दररोज वाढवली होती.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांच्या दर्शनाचा सोहळा कधी आयोजित करावा याचा निर्णय चर्च घेते. दर १० वर्षांनी या सोहळ्याचे गोव्यात आयोजन केले जाते. यंदाचा सोहळा हा अंतिम असल्याची पसरवली जाणारी माहिती ही निव्वळ अफवा असल्याचे सरकारी आयोजन समितीचे उपाध्यक्ष तथा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सॅम्युअलचे खुनी कोण? आत्‍महत्‍येपूर्वी जबर मारहाण, डोळ्‍यावरही प्रहार, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Horoscope: ग्रह-नक्षत्रांची बदलती चाल: आज 'या' 4 राशींना मिळणार नशिबाची भक्कम साथ, धनलाभासह व्यवसायात होणार मोठी प्रगती!

Viral News: मुस्लिम पती, 5 मुलं अन् 45 वय; आता 26 वर्षांनी लहान हिंदू प्रियकरासोबत मंदिरात थाटला संसार! 'सीमा'ची अजब प्रेम कहाणी

SAFF Championship Final: भारताचा बांगलादेशला 'धोबीपछाड'! 3-1 च्या फरकाने उडवला धुरळा, विक्रमी सहावे विजेतेपद पटकावले

Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

SCROLL FOR NEXT