Saint Francis Xavier Exposition 
गोवा

Saint Francis Xavier Exposition: संत झेवियरच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी; अवशेष दर्शनाची वेळ 2 तासांनी वाढवली

Saint Francis Xavier Exposition: संत झेवियर अवशेष दर्शन सोहळ्याला आत्तापर्यंत ६५ लाख भाविकांनी भेट दिली असून, ही संख्या ८० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Pramod Yadav

Saint Francis Xavier Exposition

ओल्ड गोवा: गोंयचो सायब अशी ओळख असलेल्या संत फ्रान्सिस झेवियर यांचा अवशेष दर्शन सोहळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. या सोहळ्याचे आता केवळ सहा दिवस उरले असून, भाविकांचा प्रतिसाद पाहता दर्शनाची वेळ दोन तासांनी वाढवण्यात आली आहे. यामुळे भाविकांना सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत झेवियर यांच्या अवशेषांचे दर्शन घेता येणार आहे.

मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी रविवारी (२९ डिसेंबर) याबाबत माहिती दिली. संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेष दर्शनाचा कालावधी दोन तासांनी वाढवण्यात आला आहे. आता भाविकांना सकाळी सहा ते सायंकाळी सात या वेळेत अवशेषांचे दर्शन घेता येणार आहे. उरलेल्या सात दिवसांसाठी ही वेळ लागू असेल, अशी माहिती सिक्वेरांनी दिली.

नाताळपासून राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. राज्यात येणार पर्यटक ओल्ड गोव्याला भेट देतच असतो. त्यामुळे ओल्ड गोवा चर्च परिसरात गेल्या काही दिवसांपासून गर्दी वाढत आहे. दर्शनाच्या वेळेत वाढ करण्याता निर्णय समितीने घेतला आहे. समितीने दिलेल्या माहितीनुसार, संत झेवियर अवशेष दर्शन सोहळ्याला आत्तापर्यंत ६५ लाख भाविकांनी भेट दिली असून, ही संख्या ८० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

येत्या रविवारी दर्शन सोहळ्याची सांगता होईल, अवघे काही दिवस शिल्लक असल्याने भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिस आणि स्वंय सहाय्यक तैनात करण्यात आल्याची माहिती समितीने दिली आहे. २१ नोव्हेंबर रोजी ओल्ड गोव्यात झेवियर यांच्या अवशेष दर्शनाचा शुभारंभ झाला. येत्या ०५ जानेवारी रोजी त्याची सांगता होणार आहे. दहा वर्षातून एकदा होणाऱ्या या सोहळ्याला यावेळी उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT