St Francis Xavier’s exposition, Pope Francis Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition 2024: फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शनाला पोप फ्रान्सिस राहणार अनुपस्थित; हे आहे कारण

St Francis Xavier Exposition 2024: पोप यांचे वेळापत्रक ठरलेले असल्याने त्यांना दोन वर्षांपूर्वी आमंत्रण पाठवले पाहिजे, अशी माहिती पार्थिव प्रदर्शन सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या समितीचे सदस्य फादर हेन्री फाल्काव यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

St Francis Xavier Exposition 2024 pope francis absent reason

तिसवाडी: ‘गोयचो सायब’ म्हणून प्रसिद्ध असलेले सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र शवप्रदर्शन सोहळ्यास २१ नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे. साधनसुविधांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत; परंतु या सोहळ्याला रोमन कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची उपस्थिती लाभणार नाही; कारण त्यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.

पोप यांचे वेळापत्रक ठरलेले असल्याने त्यांना दोन वर्षांपूर्वी आमंत्रण पाठवले पाहिजे, अशी माहिती पार्थिव प्रदर्शन सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी असलेल्या समितीचे सदस्य फादर हेन्री फाल्काव यांनी दिली.

दहा वर्षांनी एकदा होणारे शवप्रदर्शन ४५ दिवस चालणार असून मोठ्या संख्येत भाविक यासाठी येणार आहे. २१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान हा सोहळा सुरू राहणार आहे. यावेळी दिल्लीचे आर्च बिशप अनिल कुटो हे उपस्थित राहणार आहेत. दरवर्षीप्रमाणे गोव्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती लाभणार असल्याचे फा. फाल्काव यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, प्रदर्शनाची तयारी जोमात सुरू असून जुने गोवे परिसरातील रस्ते हॉटमिक्स केले जात आहेत. निर्धारित वेळेनुसार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता प्रार्थना सभा होईल. २२ नोव्हेंबर ते ४ जानेवारीपर्यंत सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांना सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे.

१७ नोव्हेंबर रोजी आढावा बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आढावा बैठक घेतली होती. त्यात ९० टक्के काम झाले असून १५ नोव्हेंबरपर्यंत बाकी काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले होते. १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा आढावा बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: 'कॅश फॉर जॉब प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज नाही'; वाचा ठळक बातम्या

Cash For Job Scam: दोन सरकारी कर्मचाऱ्यांसह 33 जणांना अटक; राजकीय कनेक्शनबाबत गोवा पोलिसांनी केला महत्वाचा खुलासा

Goa Crime: चोरीची तक्रार केली म्हणून रेस्टॉरंट मालकाचा काढला काटा; सहा वर्षानंतर दोघांना जन्मठेप, 1 लाख दंड

Cash For Job प्रकरणात सत्तरीतील युवकाला अटक! डिचोलीतील पाचजणांकडून उकळले 21.5 लाख

Jaipur - Goa Flight: पर्यटकांसाठी खूशखबर! गुलाबी शहरातून गोव्यासाठी सुरु होणार आणखी एक फ्लाईट

SCROLL FOR NEXT