Amit Shaha|Bashudev Bhandari  Canva|Dainik Gomantak
गोवा

Saint Estevam Crime: सांतइस्तेव प्रकरणी 'अमित शहा' घालणार लक्ष? 'बाशुदेव'च्या कुटुंबियांकडून आमदार, खासदारांना निवेदने

St Estevam Accident: बेपत्ता झालेल्या बाशुदेव भंडारी याचे प्रकरण अखेर केंद्रीय गृह मंत्रालयापर्यंत पोचले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

St Estevam River Tragedy

पणजी: सांतइस्तेव येथे कार बुडाल्यानंतर ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर बेपत्ता झालेल्या बाशुदेव भंडारी याचे प्रकरण अखेर केंद्रीय गृह मंत्रालयापर्यंत पोचले आहे. बाशुदेव यांची आई उमादेवी यांनी गुजरातेत भडोच येथील जिल्हा पोलिस अधीक्षक, आमदार आणि खासदारांना निवेदने सादर केली. ती निवेदने आता केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविण्यात आली आहेत.

बाशुदेव भंडारी यांचे कुटुंब मूळचे नेपाळमधील असले, तरी ते गुजरातेत भडोच येथे स्थायिक आहे. त्यामुळे गुजरातमधील एक युवक गोव्‍यात बेपत्ता झाल्याची खबर तेथील पोलिसांना देण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा हे गुजरातमधील असल्याने ते या प्रकरणात लक्ष घालतील, असे भंडारी कुटुंबीयांना वाटते.

तपासकामाला गती; नारायण भंडारी

जुने गोवे पोलिसांनी कारमधून वाचलेल्या युवतीची आपल्या समक्ष जबानी घ्यावी, असा भंडारी कुटुंबीयांचा आग्रह आहे. बाशुदेवचे वडील नारायण आणि वडीलबंधू बलराम यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची रविवारी भेट घेतल्यानंतर तपासकामाला गती आल्याचे त्यांना वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Quepem: '..अंधाराची खंत तू कशाला करिसी रे'! अंथरुणाला खिळलेल्या 75 वर्षाच्या व्यक्तीचे घर कोसळले, श्रमधाममधून 15 दिवसात पुनर्बांधणी

Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

SCROLL FOR NEXT