Saint Estevam Accident Dainik Gomantak
गोवा

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

गोमन्तक डिजिटल टीम

बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी त्याचा मित्र कल्पराज आणि कल्पराजच्या प्रेयसीची पोलिस मुख्यालयात आज सायंकाळी दोन तास चौकशी करण्यात आली. या तपासातून फारसे काही हाती लागलेले नाही, अशी माहिती मिळाली आहे. ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री सांतइस्तेव येथील फेरीधक्क्यावरून कार नदीत गेल्यानंतर कारमधील युवती वाचली तर बाशुदेव बेपत्ता झाला आहे.

बाशुदेवचे वडिल नारायण व भाऊ बलराम यांनीही कल्पराज व त्याच्या प्रेयशीसी संवाद साधला. तेव्हा त्या युवतीने बाशुदेवला प्रथमच पाहिले असे सांगितले. कल्पराजकडून बाशुदेव गोव्यात आल्यानंतर कधी कोणासोबत होता. युवती व बाशुदेवचे संबंध कसे होते याची माहिती पोलिसांनी घेतली. कल्पराजसोबत आई तर प्रेयसीसोबत तिचे काका आले होते. त्यांनी पोलिसांना आताच काय ती जबानी घ्या, असा आग्रह धरला होता.

तर बाशुदेव पाण्याबाहेर का आला नाही?

पोलिसांनी बाशुदेवच्या कारची धडक बसल्याने त्याच्या कारचा दुसऱ्या कारमधून पाठलाग केलेल्या दोघांकडून आणि सांतइस्तेव फेरी धक्क्यावर त्यावेळी उपस्थित असलेल्या क्रेटा कार चालकाकडून कार बाशुदेवच चालवत होता, याची खात्री करून घेतली आहे. यामुळे तीन मीटर नदीतील अंतर कापून युवती पाण्याबाहेर येऊ शकते, तर सहा फूट उंच असा, पोहता येणारा बाशुदेव पाण्याबाहेर का आला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हे प्रश्न आता पोलिसांसमोर उपस्थित केले जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

SCROLL FOR NEXT