Sahil khan Arrested Dainik Gomantak
गोवा

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Mahadev Betting App Case: पोलिसांनी साहिलला शिंदेवाडी न्यायालयात हजर केले, तेथून त्याला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Manish Jadhav

Sahil Khan Arrested In Mahadev Betting App Case: सुमारे 15 हजार कोटी रुपयांच्या प्रसिद्ध महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या सेंट्रल सायबर सेलच्या एसआयटीने 50 वर्षीय अभिनेता साहिल जाहिद खानला जगदलपूर (छत्तीसगड) येथून अटक केली. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सुमारे 40 तासांनंतर पोलिसांनी साहिलला अटक केली.

त्यानंतर पोलिसांनी त्याला शिंदेवाडी न्यायालयात हजर केले, तेथून त्याला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. साहिलने त्याचा पासपोर्टही न्यायालयात सरेंडर केला आहे. याशिवाय, त्याने महादेव बेटिंग ॲप आणि द लायन बेटिंग ॲपसोबत केलेल्या कराराची आणि बँक स्टेटमेंटची कॉपीही न्यायालयात जमा केली आहे.

दरम्यान, या करारानुसार साहिलला दररोज 3 लाख रुपये मिळणार होते आणि हा करार 22 महिन्यांसाठी होता. डीसीपी दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली पीआय मौसमी पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच साहिल मुंबईतून (Mumbai) फरार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र साहिल वारंवार त्याचे लोकेशन बदलत होता.

गडचिरोलीतही त्याचे लोकेशन मिळाले

दरम्यान, फरार असताना साहिल खानचा गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये शोध घेण्यात आला. त्याचे गडचिरोली लोकेशनही मिळाले. अखेर जगदलपूर (छत्तीसगड) येथील हॉटेलमधून साहिलला पकडण्यात पोलिसांना यश आले. मात्र, जामीन अर्ज फेटाळण्याआधी आणि फरार होण्यापूर्वी साहिल मुंबई पोलिसांना दररोज सुमारे 3 तास ​​तपासात सहकार्य करत होता.

भव्य पार्ट्या आणि सेलिब्रिटींद्वारे ॲप प्रमोशन

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल खान, जो महादेव गेमिंग ॲप नेटवर्कचा एक भाग होता. याशिवाय, तो लायन बुक नावाच्या दुसऱ्या गेमिंग ॲपमध्ये देखील सहभागी असल्याचे आढळून आले आहे. साहिलवर लोटस बुक 24/7 ॲपची जाहिरात केल्याचाही आरोप आहे.

लोटस बुक ॲपचे प्रमोशन केल्यानंतर साहिलने लायन बुक ॲप लाँच केले होते, असे म्हटले जाते. छत्तीसगडचा (Chhattisgarh) रहिवासी असलेल्या साहिलवर कथितरित्या भव्य पार्ट्या आणि सेलिब्रिटींना बोलावून बेटिंग ॲपचा प्रचार केल्याचा आरोप आहे. बेटिंग ॲपचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली साहिलशिवाय अन्य 31 जणांची चौकशी सुरु आहे.

डझनभर कलाकारांची चौकशी पोलिसांनी चौकशी केली

एसआयटी आता महादेव बेटिंग ॲप आणि काही रिअल इस्टेट कंपन्यांमधील बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करत आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींची बँक अकाऊंट, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेटची तपासणी करण्यात येत आहे.

तपास पथकाला गेमिंग ॲप्सशी संबंधित वेबसाइट्सवर अनेक सेलिब्रिटींचे व्हिडिओ मिळाले होते, जे महादेव ॲपची जाहिरात करताना दिसले होते. यामध्ये श्रद्धा कपूर, शक्ती कपूर, बी प्राक, कपिल शर्मा, बोमन इराणी, विवेक ओबेरॉय, कुणाल खेमू, आदित्य रॉय कपूर आणि हुमा कुरेशी यांसारख्या अनेक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. याप्रकरणी साहिलशिवाय आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

SCROLL FOR NEXT