Mahadev Betting App Scam: महादेव सट्टा प्रकरणी मोठी अपडेट! फरार संशयितांना दिल्ली, गोव्यातून अटक

Mahadev Betting App Scam: दोन्ही आरोपी गेल्या 8 महिन्यांपासून फरार होते, त्यांना दिल्ली आणि गोव्यातून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Mahadev Betting App Scam
Mahadev Betting App ScamDainik Gomantak

Mahadev Betting App Scam

महादेव सट्टा प्रकरणात इतर राज्यातून संशयित आरोपींना अटक करण्यात EOW (Economic Offence Wing) ला यश आले आहे. छत्तीसगडमधील प्रसिद्ध बेटिंग प्रकरणाबाबत कारवाई करत EOW ने रितेश यादव आणि राहुल वक्ते यांना अटक करण्यात आलीय.

दोन्ही आरोपी गेल्या 8 महिन्यांपासून फरार होते, त्यांना दिल्ली आणि गोव्यातून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महादेव ऍप बेटिंग प्रकरणात चंद्रभूषण वर्माच्या अटकेनंतर फरार असलेल्या राहुल वक्ते आणि रितेश यादव यांचा अनेक दिवसांपासून शोध सुरु होता, त्यांना अखेर अटक करण्यात आली आहे.

राहुल वक्ते याला दिल्लीतून तर रितेश यादव हा गोव्यातून अटक करण्यात आलीय. दोघेही जवळपास 7-8 महिने लपून बसले होते. या आरोपींपैकी राहुल वक्ते हा हवालाचे पैसे घेऊन वर्मापर्यंत पोहोचवायचा, असे सांगितले जात आहे.

यामध्ये राहुल वक्ते यांच्या नावावर 3 नोंदणीकृत फर्म असल्याची माहिती एजन्सीला मिळाली. या फर्ममध्ये आरोपींनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा केली आहे. आरोपी रितेश यादव हे चंद्रभूषण वर्मा आणि सतीश चंद्राकर यांना हवालाद्वारे पैसे मिळवून देण्यासाठी मदत करत होते.

Mahadev Betting App Scam
Pramod Sawant Birthday: PM मोदींनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, सावंतांनी जनतेकडे काय मागितले बर्थडे गिफ्ट?

गोवा पोलिसांनी देखील महादेव सट्टा प्रकरणात एफआयआर नोंदवला आहे. आरोपी रितेश यादव पुण्यात महादेव पॅनल चालवत होता. दरम्यान, ब्युरोच्या पथकाने पुणे पोलिसांची मदत घेऊन छापा टाकत पॅनेल चालवणाऱ्या 8 आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.

पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पॅनल चालकांवर कारवाई केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com