उल्हास तुयेकर  Dainik Gomantak
गोवा

नावेली हायवे जंक्शनवर सुरक्षा उपाय योजना; उल्हास तुयेकरांची सूचना

कन्सल्टन्सीचे प्रतिनिधी तसेच वाहतूक पोलिस निरीक्षक गौतम साळुंखे उपस्थित

दैनिक गोमन्तक

मडगाव: नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी काल सकाळी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसमवेत नावेली बायपास जंक्शनजवळील रस्त्याची पाहणी केली व तेथील वाढते अपघात टाळण्यासाठी त्वरित उपाय योजण्याच्या सूचना केल्या. स्थानिक कार्यकर्त्यांबरोबरच यावेळी सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रीय महामार्ग विभाग, बायपास ठेकेदाराचे प्रतिनिधी, कन्सल्टन्सीचे प्रतिनिधी तसेच वाहतूक पोलिस निरीक्षक गौतम साळुंखे उपस्थित होते.

यावेळी तुयेकर यांनी रस्त्याचा तो भाग तसेच बायपास जंक्शन फिरून पाहिले असता जंक्शन बांधले तरी तेथे दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो व त्यातून अपघात घडतात असे आढळून आले व तुयेकर यांनी त्वरित सिग्नल व दिशादर्शक फलक उभारण्याची सूचना केली. हे वाहतूक बेट सदोष असल्याच्या लोकांच्या तक्रारी असल्याने त्याची दखल घेऊन त्यात सुधारणा करण्याचा निर्णयही घेतला गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Investigation: सॅम्युअल ब्रागांझा मृत्यू प्रकरणाचा तपास अद्याप रखडलेलाच; आत्महत्येच्या प्राथमिक संशयानंतरही पडद्यामागचे गूढ वाढेना

NSUI: बालरथांचे 'सुरक्षा ऑडिट' करावे! 'एनएसयूआय' आक्रमक, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

Panaji: महापालिकेचा माणुसकीचा हात! बेघर आणि भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू केली विशेष हेल्पलाईन

Goa Congress: कॅसिनोशी जोडलेल्या अवैध 'स्पा'ना संरक्षण कोणाचे? पणजीत 40 हून अधिक अवैध 'स्पा'- प्रतीक्षा खलप

Goa E20 Petrol: गोव्यात 'ई-20' पेट्रोलविरोधात 'आप' आक्रमक! इंधन निवडण्याचा अधिकार वाहनधारकांना देण्याची वाल्मिकी नाईक यांची मागणी

SCROLL FOR NEXT