गोव्यात कोरोनाचे 7 नवे बाधित दोघे बरे; सक्रिय रुग्ण 34

कोरोना संक्रमणाचा दरही 1.07 टक्के इतका झाला
Goa Corona Updates
Goa Corona UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोरोनाची तिसरी लाट आता जवळजवळ ओसरली असून गोव्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. काल कोरोना संक्रमणाचा दरही 1.07 टक्के इतका झाला असून सक्रिय रुग्णांची संख्या 34 इतकी झाली आहे, तर गेल्या चोवीस तासांत केवळ नवे 7 बाधित रुग्ण सापडले आहेत.

राज्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 307 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 441 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.42 टक्के इतके आहे.

Goa Corona Updates
'काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय वापर'

सध्या राज्यात 34 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू नसल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 832 कायम आहे. काल दिवसभर 651 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या, त्यापैकी 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता राज्यात एकूण कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असून आज 2 जण कोरोनातून पूर्ण बरे झाले.

दरम्यान, महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही कोविडबाधितांची संख्या अत्यल्प बनल्यामुळे तसेच नवीन लाट येण्याची शक्यता नसल्यामुळे राज्यातही कोविड निर्बंध संपूर्णत: हटवण्याबाबत तज्ज्ञांचे एकमत झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Cutbona jetty sanitation issues Goa
Mapusa Market Nullah Cleaning
Goa Assembly Elections 2027
Goa Human Trafficking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com