Safari Park in Goa | Wildlife Sanctuary in Goa Dainik Gomantak
गोवा

Safari Park in Goa: नेत्रावली किंवा मोले अभयारण्यात सफारी पार्क उभारणार? मंत्री विश्वजित राणेंनी दिली महत्वाची माहिती

मंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्रावली किंवा मोले अभयारण्यात वन्यजीव सफारी पार्क उभारण्यासाठी त्यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

दैनिक गोमन्तक

Wildlife Sanctuary in Goa : गोव्यात अनेक अभयारण्ये आहेत. यामध्ये विविध जाती-प्रजातीचे प्राणी तसेच पक्षी वास्तव्याला आहेत. या अभयारण्यांचा राज्याच्या पर्यटन विकासामध्ये महत्वाचा वाटा आहे. वनमंत्री डॉ. विश्वजित राणे यांनी नुकतेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अभयारण्यांबद्दलची महत्वाची माहिती दिली असून राज्यात लवकरच जंगल सफारी सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.

मंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्रावली किंवा मोले अभयारण्यात वन्यजीव सफारी पार्क उभारण्यासाठी त्यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

ते म्हणाले की, मी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांना या प्रस्तावासाठी काम करण्याची विनंती केली आहे. जर गोव्यातील अभयारण्यात सफारी पार्क झाले तर यामुळे राज्यभरातील पर्यटन उद्योगाला चालना मिळेल आणि त्याचा एकंदरीत अर्थव्यवस्थेला फायदा होईल.

या प्रस्तावामुळे गोव्यात येणारे पर्यटक हे फक्त बीचकडे न वळता इथल्या निसर्गाकडे वळू शकतात. आता विश्वजित राणे यांनी दिलेल्या या प्रस्तावाबाबत केंद्र सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT