Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Sadetod Nayak : विरोधकांना एकत्र आणणार; लोकसभेसाठी लवकरच बैठक

सडेतोड नायक : बंडखोरांबाबत जनतेत चीड : पाटकर

गोमन्तक डिजिटल टीम

Sadetod Nayak : आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्षाने अधिक गांभीर्याने घेतलेली आहे. गोव्यातील दोन्ही मतदारसंघांतून उमेदवार जिंकून आणण्‍यासाठी आम्ही कंबर कसली आहे. गोवा प्रभारी मणिकम टागोर हे पक्षबांधणी तसेच इतर कामांसाठी बैठका आहेत. जनतेनेही भाजपविरोधातील आक्रोश मतदानातून व्यक्त करण्याचा निर्धार केला आहे.

लोकसभा निवडणूक एकत्र लढण्‍यासाठी विरोधी पक्ष काँग्रेससह आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड, ‘आरजी’ची लवकरच संयुक्त बैठक बोलाविणार आहे. कोणत्‍याही परिस्‍थितीत लोकसभेच्‍या दोन्‍ही जागा जिंकणे हेच आमचे ध्येय आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.

गोमन्तक टीव्हीवरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात पाटकर बोलत होते. संपादक-संचालक राजू नायक यांनी त्‍यांच्‍याशी संवाद साधला.

काँग्रेसचे गोवा प्रभारी टागोर हे संघटनात्मक पक्षबांधणी तसेच पक्षवाढीच्या बाबतीत काम करण्यात अग्रेसर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम नियोजनबद्धरित्‍या सुरू आहे.

काँग्रेस पक्षातून जे आठ आमदार भाजपमध्‍ये गेले, ते स्वतःच्या स्वार्थासाठी. भाजपने खोके देऊन त्यांना धोका दिला. काँग्रेसला सोडून गेलेल्या आमदारांबाबत जनतेत प्रचंड आक्रोश आहे. मी प्रत्येक मतदारसंघात फिरतो, तेथे या बंडखोर आमदारांविरोधात बोलले जातेय.

ज्या मतदारसंघांतून आमचे आमदार फुटले, तेथे नव्याने पक्षबांधणी करत असून, आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमचे आमदार फुटले तरी मतदार मात्र काँग्रेससोबतच आहेत, असा दावा पाटकर यांनी केला.

‘ती’ अफवा भाजपनेच पसरविली

अफवा पसरविण्‍यात भाजप तरबेज आहे. मला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटविले जाणार ही अफवासुद्धा भाजपनेच पसरविली. अलीकडच्‍या काळात काँग्रेस पक्षाची ताकद वाढलेली आहे. ज्यावेळी भाजपला धोका निर्माण होतो, त्यावेळी ते अशा प्रकारच्या अफवा पसरवितात.

त्यातीलच हा प्रकार आहे. काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच ज्‍येष्‍ठ नेते राहुल गांधी यांच्याशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे. राज्‍यातील लोकसभेच्‍या दोन्‍ही जागा जिंकणे हेच सध्‍या आमचे टार्गेट आहे, असे पाटकर यांनी स्‍पष्‍ट केले.

...म्हणून काँग्रेसने उभा केला नाही राज्‍यसभा निवडणुकीसाठी उमेदवार

राज्यसभेसाठी उमेदवार दिला नाही म्‍हणून आमच्यावर टीका झाली. वास्तविक राज्यसभेसाठी उमेदवार उभा करण्याकरिता विधानसभेत पक्षाचे किमान १० टक्के आमदार असणे गरजेचे आहे. काँग्रेसचे तीनच आमदार आहेत. खरे म्‍हणजे ते चार आमदार हवे होते.

सर्व विरोधकांचा मिळून एक उमेदवार द्यायचे म्हटले तरी २५ टक्के आमदार असणे गरजेचे आहे आणि ही २५ टक्के आमदारांची संख्या १० होते.

सध्‍या विरोधात केवळ ७ आमदार आहेत. त्‍यामुळेच राज्‍यसभेसाठी उमेदवार उभा केला नाही, असे पाटकर यांनी स्‍पष्‍ट केले.

सध्‍या विरोधी गटात केवळ ७ आमदार आहेत. परंतु हे सात आमदारच सरकारला भारी पडताहेत. अनेक प्रश्‍नांवर त्‍यांनी सरकारला घेरले असून उत्तरे देण्‍यात मंत्री अपयशी ठरत आहेत. विरोधकांची ही एकजूट सरकारसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कला अकादमी, राष्‍ट्रीय क्रीडा स्‍पर्धा व अन्‍य काही प्रकरणांत सरकारचे पितळ उघडे पडले आहे.

अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT