G20 Meet In Goa: गोव्यात 2050 पर्यंत 100 टक्के वीज अक्षय उर्जेवर निर्माण होईल; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

सौर ऊर्जा निर्मितीमध्येही 7 पट वाढ
CM Pramod Sawant on renewable energy in G20 meet in Goa:
CM Pramod Sawant on renewable energy in G20 meet in Goa: Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant on renewable energy in G20 meet in Goa: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 2050 पर्यंत गोव्यातील प्रत्येक भागात 100 टक्के अक्षय वीज पुरवठा सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले.

गोवा राज्य सौर ऊर्जेचा उत्तम वापर करण्याच्या मार्गावर आहे आणि राज्याचे सौर धोरण देशांतर्गत स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर केंद्रित आहे, असेही ते म्हणाले. गोव्यात 2019 पासून सौर ऊर्जा निर्मिती सातपट वाढली आहे.

CM Pramod Sawant on renewable energy in G20 meet in Goa:
Uber Taxi in Goa: गोव्यात उबर टॅक्सी सेवा सुरू होणार

मिशन इनोव्हेशन (MI) बैठकीत गोव्याच्या स्वच्छ ऊर्जा रोडमॅप 2050 लाँच करताना ते बोलत होते. ते म्हणाले की गोव्याच्या एनर्जी व्हिजन अंतर्गत आणि स्वच्छ ऊर्जा रोडमॅपच्या विश्लेषणानुसार गोवा 2050 पर्यंत किंवा त्याही आधी 100 टक्के अक्षय उर्जा आधारित वीजपुरवठा करण्याचे लक्ष्य गाठू शकेल.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा सरकार गोव्यातील पर्यटनाला हरित पर्यटनात रूपांतरीत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठीचा धोरणात्मक रोडमॅप आधीच तयार आहे आणि आम्ही लवकरच या निसर्गाधारीत उद्योगाला डीकार्बोनाइज करण्यासाठी अक्षय ऊर्जेचा कसा वापर करता येईल, तसेच ऊर्जा कार्यक्षमतेच्या अनेक उपक्रमांसाठी ब्लू प्रिंट सादर करू.

CM Pramod Sawant on renewable energy in G20 meet in Goa:
Khandepar News: खांडेपार येथे तरूणाची पुलावरून नदीत उडी; शोध सुरू

मुख्यमंत्री म्हणाले की, वाहतूक, उद्योग, आरोग्य, कृषी आणि मत्स्य व्यवसाय, तसेच अन्न यांसारखी इतर महत्त्वाची क्षेत्रे, स्वच्छ तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा जलद अवलंब सुनिश्चित करण्यासाठी जागरूकता मोहिमा आणि कौशल्य कार्यक्रमांसह, लोककेंद्रित योजनांची मालिका राबवण्यासाठी सरकार सज्ज आहे.

ते पुढे म्हणाले की, स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान आणि या पद्धतींचे प्रायोगिक प्रात्यक्षिक, नाविन्यपूर्ण सेवा वितरण मॉडेल किंवा दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी गोवा सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. गोव्याच्या स्वच्छ ऊर्जा रोडमॅपचे उद्दिष्ट 2050 पर्यंत अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांचे डीकार्बनायझेशन करणे हे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com