भाजपमध्ये अनेक उमेदवार होण्याच्या पात्रतेचे आहेत. हे चांगले लक्षण असले तरी त्यापैकी काहीजण बंड करू शकतात.  Dainik Gomantak
गोवा

‘ईडीसीचा 2021-22 चा नफा 52.47 कोटी’

याबाबतची माहिती महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यात लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकांना आर्थिक साहाय्य करणाऱ्या गोवा सरकारच्या आर्थिक विकास महामंडळाचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा करानंतरचा निव्वळ नफा 52.47 कोटी रुपये झाल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे.

या आर्थिक वर्षाच्या आर्थिक विवरणाला मंजुरी देण्यासाठी महामंडळाची बैठक झाली. यानंतर तानावडे बोलत होते. 2021-22 या आर्थिक वर्षात 75.58 कोटी रुपयांची उलाढाल झाली असून करानंतरचा एकूण नफा ५२.४७ कोटी झाला आहे.

कोविड महामारी काळात गोवा सरकारने हाती घेतलेल्या विविध मदतकार्यांना पाठिंबा देण्यासाठी महामंडळाच्या वतीने आपल्या सीएसआर निधीतून भरीव योगदान दिले आहे. व्यवस्थापकीय संचालक बी.एस. पै आंगले यांनी महामंडळाच्या कामकाजाची माहिती देत भागधारकांनी दिलेला पाठिंबा आणि सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

गोवा सरकारची महत्त्वपूर्ण संस्था

तानावडे म्हणाले की, आर्थिक विकास महामंडळ हे गोवा सरकारची महत्त्वपूर्ण आर्थिक संस्था असून रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत आहे. संस्थेच्या वतीने सरकारच्या विविध आर्थिक योजना राबविल्या जातात. यात मुख्यमंत्री रोजगार योजना महत्त्वाची आहे. याबरोबरच राज्यात उद्योजक तयार व्हावेत यासाठी मार्गदर्शन आणि वित्तीय साहाय्य संस्था पुरवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

SCROLL FOR NEXT